भारतात ओमिक्रॉनचा शिरकाव?; 'त्या' प्रवाशात आढळली वेगळी लक्षणे - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, November 30, 2021

भारतात ओमिक्रॉनचा शिरकाव?; 'त्या' प्रवाशात आढळली वेगळी लक्षणे

https://ift.tt/3E7XHCP
बेंगळुरू: संसर्गाच्या व्हेरिएंटचा वेगाने फैलाव होत असल्याने जगभरात खळबळ उडाली असतानाच दक्षिण आफ्रिकेतून भारतात बेंगळुरू येथे परतलेल्या दोन प्रवाशांबाबत महत्त्वाची माहिती हाती आली आहे. या दोघांची करण्यात आली असता त्यातील एका प्रवाशाच्या चाचणी अहवालावरून चिंता व्यक्त होऊ लागली आहे. या व्यक्तीमध्ये जी लक्षणे आढळली आहेत ती डेल्टा व्हेरिएंटपेक्षा वेगळी असून याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालय तसेच आयसीएमआर यांच्या अधिकाऱ्यांशी कर्नाटक सरकारने संपर्क केला आहे. ( ) वाचा: दक्षिण आफ्रिकेतून बेंगळुरू येथे आलेल्या दोन प्रवाशांपैकी एका व्यक्तीमध्ये आढळल्याची चर्चा होती. याबाबत कर्नाटकचे आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांना विचारले असता त्यांनी महत्त्वाचा तपशील दिला. बेंगळुरूत एका रुग्णामध्ये ओमिक्रॉनची लक्षणे आढळली, असे माध्यमे म्हणत असली तरी मी त्याला दुजोरा देऊ शकत नाही. याबाबत आम्ही आयसीएमआर आणि केंद्र सरकारच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आहे. त्यांच्या सांगण्यानुसार नमुने आयसीएमआरकडे पाठवण्यात आले आहेत. या व्यक्तीचा कोविड चाचणी अहवाल पाहता डेल्टापेक्षा वेगळ्या प्रकारची लक्षणे आहेत इतकेच मी सांगू शकतो, असे सुधाकर यांनी नमूद केले. संबंधित व्यक्ती ६३ वर्षीय असल्याचेही त्यांनी सांगितले. वाचा: दक्षिण आफ्रिकेतून येत असलेल्या प्रवाशांवर आम्ही गेल्या १४ दिवसांपासून लक्ष ठेवून आहोत. त्यांच्या निकटच्या संपर्कातील लोकांची तपासणीही आम्ही सुरू केली आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंटबाबत विस्तृत अहवाल प्राप्त होणार असून तो आल्यावर पुढील पावले टाकली जातील, असेही त्यांनी सांगितले. सुधाकर हे वैद्यकिय चिकित्सकही आहेत. दक्षिण आफ्रिकेतील डॉक्टर मित्राचा हवाला देत त्यांनी नव्या विषाणूबाबत अधिक माहिती दिली. डेल्टाइतका घातक नाही. ओमिक्रॉनची लागण झाल्यास अस्वस्थ वाटू शकते, उलटीचा त्रास होऊ शकतो, नाडीचे ठोकेही वाढू शकतात, असे त्या मित्राचे म्हणणे असल्याचे सुधाकर यांनी सांगितले. यात वास न येणे आणि चव जाणे ही लक्षणे आढळत नाहीत, असेही त्यांनी नमूद केले. या संसर्गाची लक्षणे तीव्र नसतील आणि रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण फारच कमी राहील, असेही ते म्हणाले. वाचा: