नव्या बॉसच्या शोधात सेबी; अर्थ मंत्रालयाने मागवले अर्ज, ही आहे अंतिम मुदत - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, November 1, 2021

नव्या बॉसच्या शोधात सेबी; अर्थ मंत्रालयाने मागवले अर्ज, ही आहे अंतिम मुदत

https://ift.tt/3BvMeL9
नवी दिल्ली : सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया () च्या अध्यक्षपदासाठी अर्थ मंत्रालयाने अर्ज मागवले आहेत. सेबीचे प्रमुख अजय त्यागी यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये संपत आहे. भारतीय प्रशासकीय सेवेचे (IAS) १९८४च्या बॅचचे हिमाचल प्रदेश केडरचे अधिकारी त्यागी यांची १ मार्च २०१७ रोजी सेबीचे अध्यक्ष म्हणून तीन वर्षांच्या कालावधीसाठी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर त्यांना सहा महिन्यांसाठी सेवेत मुदतवाढ देण्यात आली. त्यागी यांचा कार्यकाळ ऑगस्ट २०२० मध्ये आणखी १८ महिन्यांनी वाढवण्यात आला. २८ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केलेल्या सार्वजनिक सूचनेमध्ये मंत्रालयाने सेबीच्या प्रमुख पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. ही नियुक्ती कमाल पाच वर्षांच्या कालावधीसाठी किंवा ६५ वर्षे वयापर्यंत, यापैकी जे आधी असेल ते केले जाईल. वित्त मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाने जाहीर सूचनेमध्ये म्हटले आहे की, पात्र उमेदवार त्यांचे अर्ज विहित नमुन्यासह आणि आवश्यक कागदपत्रांच्या साक्षांकित प्रतींसह ६ डिसेंबर २०२१ रोजी किंवा त्यापूर्वी पाठवू शकतात. यू.के. सिन्हा यांनाही मिळाली ३ वर्षांची मुदतवाढ यापूर्वी सरकारने यू.के. सिन्हा यांना तीन वर्षांची मुदतवाढ दिली होती. डी.आर. मेहता यांच्यानंतर ते सर्वाधिक काळ सेबीचे प्रमुख होते. त्यागी यांच्या नियुक्तीबाबत सरकारने दोनदा अधिसूचना प्रसिद्ध केली होती. या पदासाठीच्या उमेदवारांची नावे कॅबिनेट सचिवांच्या अध्यक्षतेखालील वित्तीय क्षेत्र नियामक नियुक्ती शोध समिती (FSRASC) द्वारे निवडली जातील. या उमेदवारांची आर्थिक व्यवहार सचिव यांच्या अध्यक्षतेखालील समितीद्वारे मुलाखत घेतली जाईल. समितीमध्ये तीन बाह्य सदस्य असतील. दरम्यान, वित्तीय क्षेत्र नियामक नियुक्ती शोध समिती (FSRASC) द्वारे उमेदवार निवडल्यानंतर, आर्थिक व्यवहार सचिवांच्या पॅनेलद्वारे त्यांची मुलाखत घेतली जाते. या पॅनेलमध्ये अशा तीन तज्ज्ञांचा समावेश आहे, ज्यांना या विषयाचे सखोल ज्ञान असते. हे बाह्य सदस्य (एक्सटर्नल मेंबर) असतात. मुलाखतीच्या आधारे FSRASC अंतिम सदस्याचे नाव नियुक्ती समितीकडे सादर करते. या समितीचे प्रमुख पंतप्रधान असतात.