
लखनऊ: माथेफिरू जावयानं सासुरवाडीला जाऊन आपल्या केली. इतकेच नाही तर, मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या सासूवरही जीवघेणा हल्ला केला. उत्तर प्रदेशातील लखनऊच्या काकोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात ही धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर आरोपी फरार झाला. स्थानिकांना ही घटना समजताच, त्यांनी पोलीस ठाण्यात माहिती दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला. पोलिसांच्या माहितीनुसार, अनिल नावाच्या व्यक्तीने आपल्या पत्नी आणि सासूवर जीवघेणा हल्ला केला. या पत्नीचा मृत्यू झाला. तर सासू जखमी झाली आहे. आरोपी आणि त्याच्या पत्नीमध्ये कोणत्या तरी कारणावरून वाद सुरू होते. पोलिसांनी सांगितले की, पोलीस घटनास्थळी पोहोचले त्यावेळी पत्नीच्या गळ्यावर जखमा झाल्या होत्या. तिचा यात मृत्यू झाला होता. तर सासू जखमी झाली होती. तिला तात्काळ ट्रामा केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. आरोपी पतीला दारूचे व्यसन होते, अशी माहितीही पोलिसांनी दिली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. आरोपी अनिलचे लग्न काकोरी येथील प्रिया हिच्यासोबत झाला होता. शुक्रवारी संध्याकाळी मल्हार येथील आपल्या सासऱ्याच्या घरी पोहोचला. तिथे त्याचा पत्नीसोबत वाद झाला. या वादानंतर आरोपीने आपल्या पत्नीवर धारदार शस्त्राने वार केले. यात तिचा मृत्यू झाला. तर मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या सासूवरही त्याने हल्ला केला. यात ती जखमी झाली. या घटनेनंतर आरोपी अनिल तेथून पसार झाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेचा तपास सुरू केल्यानंतर काही तासांतच आरोपी अनिलला ताब्यात घेतले. मिळालेल्या माहितीनुसार, प्रिया काही दिवसांपूर्वीच आपल्या मुलीसह माहेरी आली होती. घटनेच्या सहा दिवसांपूर्वीच अनिल मल्हार गावात आला होता. त्यावेळी मुलीला घेऊन आपल्या घरी म्हणजेच हरदोईच्या खसरौल येथे आला होता. त्यानंतर शुक्रवारी पुन्हा पत्नीला घेऊन तो सासुरवाडीला गेला होता.