अमरावतीमध्ये अजून किती दिवस कर्फ्यू ? 'या' गावांत संचारबंदीमध्ये शिथिलता - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, November 15, 2021

अमरावतीमध्ये अजून किती दिवस कर्फ्यू ? 'या' गावांत संचारबंदीमध्ये शिथिलता

https://ift.tt/3CeIG0b
अमरावती : अमरावती जिल्ह्यातील अतिसंवेदनशील क्षेत्र म्हणून परिचित असलेल्या अचलपूरसह तीवसा शहरासह अनेक भागांमधील संचारबंदी शिथिल करण्यात आली आहे असे आदेश उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांनी निर्गमित केले आहेत. शुक्रवारी निघालेल्या मोर्चाला अमरावती शहरात गालबोट लागलं याच पार्श्वभूमीवर शनिवारी हिंदुत्ववादी संघटनांनी काढलेल्या मोर्चावर पोलिसांनी लाठीचार्ज केला. यावेळी वातावरण चिघळत असल्याचे पाहून पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या व पाण्याचा फवारा मारून जमावाला पांगवले होते. सध्या अमरावती पोलीस आयुक्तालय हद्दीत कडक संचारबंदी लावण्यात आली आहे. ग्रामीण भागातील परिस्थिती नियंत्रणात रहावी याकरिता अचलपूर, परतवाडा, तीवसा, दर्यापूर, अंजनगाव धामणगाव चांदुर रेल्वे आदी शहरांमध्ये पोलीस पोलीस बंदोबस्तात सह संचारबंदी लागू करण्यात आली होती. जिल्ह्यातील ग्रामीण भागाची परिस्थिती सध्या व्यवस्थित असून नागरिकांना संचारबंदीतुन सुट देत दुकाने खुली करण्याचे आव्हान करण्यात आले आहे. त्रिपुरा येथे कथित प्रकरणानंतर जिल्ह्यात तणाव निर्माण झाला होता अमरावती शहरातील वातावरण अद्यापही तणावपूर्ण शांततेत असताना ग्रामीण भागातील जनजीवन मात्र पूर्वपदावर येताना दिसत आहे.