
कल्याण: कल्याणमध्ये एक भयंकर विकृत प्रकार समोर आला आहे. (Kalyan Sexual Harassment) एका तरुणीने १४ वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार केला तर या तरुणीच्या प्रियकराने पीडित अल्पवयीन मुलाच्या १६ वर्षीय अल्पवयीन बहिणीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उजेडात आली आहे. अल्पवयीन मुलावर अत्याचार करणारी तरुणी त्याचीच नातेवाईक आहे. या प्रकरणी दोघांच्या विरोधात कोळशेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी याचा पुढील तपास सुरू केला आहे. पूर्व परिसरात हा प्रकार घडला आहे. पीडित अल्पवयीन भाऊ बहिणीची व्यथा ऐकून पोलीस सुद्धा स्तब्ध झाले. पीडित मुलावर एक २३ वर्षीय तरुणी सातत्याने लैंगिक अत्याचार करीत होती. ही विकृत तरुणी पीडित अल्पवयीन मुलाची नातेवाईक आहे. आरोपी तरुणी इथेच थांबली नाही. तिने तिच्या प्रियकराला पीडित मुलाच्या अल्पवयीन बहिणीसोबत लैगिंक अत्याचार करण्यास भाग पाडले, असं देखील चौकशीत समोर आलं आहे. वाचा: गेल्या काही महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता. या दोघांची विकृती वाढतच होती. अखेर दोन्ही पीडित भावा बहिणीने नातेवाईकांच्या मदतीने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हे दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे. या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बशीर शेख यांनी सांगितले की, 'आमच्याकडे दोन वेगवेगळ्या तक्रारी दाखल केल्या आहेत. या दोन्ही प्रकरणांत योग्य कारवाई करण्यात येईल.' वाचा: