
मुंबई : अमेरिका आणि भारताने कच्च्या तेलाचा राखीव साठा बाजारात उतरवल्याने कच्च्या तेलाचा पुरवठा वाढला आहे. परिणामी बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झाली आहे. मात्र आज बुधवारी पेट्रोलियम कंंपन्यांनी देशभरात पेट्रोल आणि डिझेल दरात कोणताही बदल केलेला नाही. सलग २० व्या दिवशी इंधन दर स्थिर आहेत. आज बुधवारी मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव १०९.९८ रुपयांवर स्थिर आहे. दिल्लीत पेट्रोल १०३.९७ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव १०१.४० रुपये आहे. कोलकात्यात एक लीटर पेट्रोल १०४.६७ रुपयांवर स्थिर आहे. मुंबईत एक लीटर डिझेलचा भाव ९४.१४ रुपये आहे. दिल्लीत डिझेल ८६.६७ रुपये इतके आहे. चेन्नईत आज डिझेलचा भाव प्रती लीटर ९१.४३ रुपये असून कोलकात्यात डिझेलचा भाव ८९.७९ रुपये आहे. गेल्या आठवड्यात तेलाच्या किंमतीत घसरण झाली होती. यामुळे ओपेकने उत्पादनात कपातीचे संकेत दिले होते. तर त्याआधी तेलाचा भाव ८५ डॉलरवर गेल्याने महागाईचे संकट गडद बनले होते. महागाईचा संभाव्य भडका रोखण्यासाठी अमेरिकेने तेलाचा राखीव साठा वापरण्याचा निर्णय घेतला. त्यापाठोपाठ भारताने देखील राखीव साठा वापरण्याची घोषणा केली आहे. यामुळे बाजारात कच्च्या तेलाचा पुरवठा वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, कमॉडिटी बाजारात बुधवारी डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव १२ सेंट्सने घसरला आणि तो ७८.३८ डॉलर प्रती बॅरल झाला.