
: सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. हा पराभव जिव्हारी लागल्याने शिंदे यांच्या समर्थकांनी थेट राष्ट्रवादीच्या कार्यलयावरच दगडफेक केली. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांनी सायंकाळी जिल्ह्यातील नेत्यांची बैठक () बोलावली. शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला शशिकांत शिंदे यांच्यासह राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील इतर प्रमुख नेते उपस्थित होते. या बैठकीत जिल्हा बँक निवडणूक निकालाबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. तसंच शशिकांत शिंदे यांच्या पराभवाबाबत शरद पवार यांनी या बैठकीत नाराजी व्यक्त केल्याचीही माहिती आहे. आमदार शशिकांत शिंदे हे शरद पवार यांचे निकटवर्तीय आणि जिल्ह्यातील महत्त्वाचे नेते मानले जातात. त्यामुळे शशिकांत शिंदे यांचा पराभव हा कोणामुळे आणि कसा झाला याबद्दल शरद पवार यांनी माहिती घेतल्याचे समजते. शशिकांत शिंदे यांना जावळी तालुक्यातून पराभव पत्करावा लागला. राष्ट्रवादी पक्षातून बंडखोरी करुन आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या मदतीने अवघ्या एक मताने ज्ञानदेव रांजणे विजयी झाले. पक्षातूनच दगा फटका झाल्यानं आमदार शिंदे पराभूत झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. तसंच राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर व भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी एकत्र येत शशिकांत शिंदे यांच्यावर कुरघोडी केल्याचंही बोललं जात आहे. दरम्यान, मी २५ नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषद घेऊन जिल्हा बँकेच्या निवडणुकीबद्दल बोलेन आणि भविष्यातील राजकीय दिशा स्पष्ट करणार आहे, असं शशिकांत शिंदे यांनी सांगितलं आहे. त्यामुळे या पत्रकार परिषद शशिकांत शिंदे काय भूमिका घेतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.