साताराः जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे () यांना अवघ्या एका मताने पराभव पत्करावा लागला. पराभवानंतर शशिकांत शिंदे यांनी ()यांच्यावर आरोप केले होते. मला पाडण्यात संपूर्णपणे शिवेंद्रराजे भोसले यांचा हात असून त्यांना राष्ट्रवादीच्याच काही लोकांनी मदत केली, असा दावा शशिकांत शिंदे यांनी केला होता. शिंदेंच्या या आरोपांवर भाजप नेते शिवेंद्रराजे भोसले यांनी उत्तर दिलं आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर आमदार शशिकांत शिंदे यांनी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर पराभवाचं खापर फोडलं होतं त्यांनतर आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी शशिकांत शिंदे यांच्यावर एका मेळाव्यात जहरी टीका केली आहे. तुमचा पराभव हा तुमच्या बगलबच्च्यांच्या उद्योगांमुळे झाला आहे. त्यांना तुम्ही आवरलं असतं तर तुमचा पराभव झाला नसता, अशी टीका शिवेंद्रराजेंनी केली आहे. वाचाः आम्हाला हिशोब चुकता करायच्या धमक्या देऊ नका. हिशोब चुकता करायची वेळ आली तर आम्ही पण साता-यातच जन्मलोय. तुमच्या मुंबईच्या गुंडांना आमचा हिशोब परवडायचा नाही, असा इशारा शिवेंद्रराजे यांनी शशिकांत शिंदे यांना दिलाय. तसंच, षडयंत्राची भाषा शशिकांत शिंदे यांनी करु नये. आम्ही कोणतंही षडयंत्र केलं नसल्याच सांगत तुमची दहशत किती आहे. हे आम्ही राष्ट्रवादीच्या कार्यालयावर केलेल्या दगडफेकीतुन बघीतल आहे. तुम्हाला माहित असल्याशिवाय हे दगडफेकीचं कृत्य घडूच शकत नाही, असा आरोपही शिवेंद्रराजे भोसले यांनी केला आहे. वाचाः काय म्हणाले होते शशिकांत शिंदे? साताऱ्यातील मुख्य नेतेच विरोधकांना सोबत घेऊन खलबतं करतात, त्यामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या भवितव्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. साताऱ्यातून चारही राजे बिनविरोध झाले, मात्र मी राजा नाही. त्यामुळे मी बिनविरोध झालो नाही,' असा टोलाही शशिकांत शिंदे यांनी भाजपसह स्वपक्षातील विरोधकांना लगावला होता. वाचाः