महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून ते पळाले; तरुणांनी धूम स्टाइलने केला पाठलाग, दिला चोप - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, November 18, 2021

महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून ते पळाले; तरुणांनी धूम स्टाइलने केला पाठलाग, दिला चोप

https://ift.tt/3qKlxAT
म. टा. प्रतिनिधी, महिलेच्या गळ्यातील सोन्याचे हिसकावून दुचाकीवरून पळणाऱ्या चोरट्यांचा गावातील तरूणांनी तब्बल दहा किलो मीटर धुम स्टाइलने पाठलाग केला. एवढे अंतर कापल्यानंतर कोल्हापुरात त्यांना गाठले आणि तावडीत सापडलेल्या एका चोरास चांगलाच चोप दिला. दुसरा चोरटा मात्र पळून जाण्यात यशस्वी झाला. गिरगाव येथे ही घटना घडली. (the who snatched the womans and fled) क्लिक करा आणि वाचा- करवीर तालुक्यातील गिरगाव येथे दुपारी शेतातील काम आटपून एक महिला घरी जात होती. दुपार असल्याने रस्त्यावर फारशी वर्दळ नव्हती. त्याचवेळी दुचाकीवरून आलेल्या दोघा तरुणांनी त्या महिलेच्या गळ्यातील दागिने हिसडा मारून चोरून नेले. तिने आरडाओरड सुरू करताच तिथे गावातील काही तरूण आले. चोरीची घटना कळताच त्या तरूणांनी चोरट्यांचा पाठलाग सुरू केला. क्लिक करा आणि वाचा- दुचाकीवरून कोल्हापूर शहराच्या दिशेने गेले. त्यांचा पाठलाग करत ते तरूणही त्यांच्या मागे लागले. यामुळे धुम स्टाईलने पाठलाग सुरू केला. तब्बल दहा किलो मीटर हा पाठलाग सुरू होता. अखेर कोल्हापुरातील आयर्विन ख्रिश्चन हायस्कूलच्या मैदानावर ते दोघे सापडले. संतप्त तरुणांनी त्या चोरट्याला पकडून त्यास बेदम चोप दिला. त्याच्या दुचाकीची तोडफोड केली. दुसरा चोरटा पळून जाण्यात यशस्वी झाला. क्लिक करा आणि वाचा-