
: वीज बिलाची थकबाकी भरा, असं सांगणाऱ्या वायरमनच्या अंगावर करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी हल्लेखोराला राधानगरी पोलिसांनी अटक केली. प्रमोद शिवाजी कांबळे असं संशयिताचं नाव असून कोर्टाने त्याला दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसंच अन्य दोन संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत. () पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोळांकुर येथे कार्यरत असलेले वायरमन नितेश शेडमाके हे वीज बिलाची थकबाकी भरा असं सांगण्यास गेले असता प्रमोद शिवाजी कांबळे याने शिवीगाळ करून अंगावर पत्रा फेकला. तसंच घरातील तलवार घेऊन वायरमनच्या अंगावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या घटनेची पोलिसात तक्रार देऊ नको म्हणून शिवाजी सुभाना कांबळे आणि जीवन शिवाजी कांबळे यांनी सोळांकुर येथील कार्यालयात येऊन वायरमन नितेश शेडमाके यांना जीवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान, याबाबत तिघांवर राधानगरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी प्रमोद कांबळे याला अटक केली आहे.