लोणावळ्यात भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; दोन ठार - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, November 24, 2021

लोणावळ्यात भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; दोन ठार

https://ift.tt/30Tx31Q
पुणेः अहमदनगर येथून खोपोली येथे देवदर्शनासाठी जाणाऱ्या पिकअप जीपचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून २५ जण गंभीर जखमी झाले आहेत. () खोपोली येथील गगनगिरी महाराज मठ येथे देव-दर्शनासाठी भाविकांना घेऊन जात असलेल्या पिकअप जीपच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मंगळवारी सुमारे पहाटे अडीचच्या सुमारास जुन्या मुंबई- पुणे राष्ट्रीय महामार्गावर वलवण पुलाजवळ हा अपघात घडला आहे. वाचाः या अपघातात पिकअप वाहन चालक व एक प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. तर, एकूण २५ जण यात गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये १५ जण गंभीर तर १० जण किरकोळ जखमी झाले आहेत. यात पुरूष, महिला व लहान मुलांचाही समावेश आहे. या सर्वांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. अपघाताची माहिती मिळताच लोणावळा शहर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. तसंच, या घटनेचा अधिक तपास करण्यात येत आहे. वाचाः अहमदनगर जिल्ह्यातले हे भाविक असून ते गगनगिरी महाराज मठ येथे दर्शनासाठी जात होते. यावेळी पिकअपचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने वलवण गावाच्या हद्दीत जुन्या मुंबई- पुणे- राष्ट्राय महामार्गावर असलेल्या मुंबई पुणे एक्स्प्रेसवेच्या पुलाच्या सिमेंटच्या कठड्यावर जोरात धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. वाचाः