वीस दिवसांत हजारावर मुलांना करोना!; टोपे यांनी केले महत्त्वाचे विधान - Times of Maharashtra

Tuesday, November 23, 2021

demo-image

वीस दिवसांत हजारावर मुलांना करोना!; टोपे यांनी केले महत्त्वाचे विधान

https://ift.tt/3cAZkwT
photo-87855787
जालना: प्रतिबंधक लसीकरणाबाबत आज राज्याचे आरोग्यमंत्री यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. कोविडचा धोका पाहता लहान मुलांचे तातडीने लसीकरण करण्याची गरज असून आणि दोन्ही डोस घेतलेल्या ज्येष्ठ नागरिकांनाही देण्याची आवश्यकता आहे, असे टोपे म्हणाले. याबाबत केंद्रीय आरोग्यमंत्री यांच्याकडे मागणी करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले. ( ) वाचा: राज्यात कोविड स्थिती सध्या नियंत्रणात आहे. आली आहे. दैनंदिन रुग्णसंख्या सहाशेपर्यंत खाली आली आहे. असे असले तरी तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेत आरोग्य यंत्रणा सतर्क असून त्याचअनुषंगाने आरोग्यमंत्री टोपे यांनी लसीकरणाबाबत मोठे पाऊल उचलण्याचे स्पष्ट संकेत आज दिले. लहान मुलांचे लसीकरण आणि ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण यावर टोपे यांनी अधिक भर दिला. वाचा: राज्यात शाळा सुरू झाल्या असतानाच गेल्या २० दिवसांत ११ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचा एकमेकांशी संपर्क वाढून या वयोगटातील १ हजार ७११ मुलांना करोनाची लागण झाल्याचे आढळले आहे. या मुलांमध्ये लक्षणे सौम्य असली तरी ही मुले स्प्रेडरचं काम करू शकतात. त्यामुळेच खबरदारी घेण्याची गरज असून मुलांचे तातडीने लसीकरण करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे, असे टोपे यांनी सांगितले. मुलांचे लसीकरण तातडीने केले पाहिजे, असे टास्क फोर्सचेही मत असल्याचे त्यांनी पुढे सांगितले. वाचा: दिवाळीनंतर दुसऱ्या सत्रात शाळेचे सर्वच वर्ग सुरू करण्याची मागणी पालकांकडून होत आहे. त्याचा विचार करून पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाला आरोग्य विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आले आहे. याबाबतचा अंतिम निर्णय मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घेतील असेही राजेश टोपे यांनी स्पष्ट केले. राज्यात चिकनगुनियाच्या रुग्णांचे प्रमाण वाढले असून या संदर्भात नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहनही टोपे यांनी केले. याबाबत आरोग्य विभागाला देखील उपाययोजना करण्याबाबत आदेश देण्यात आल्याचे ते म्हणाले. वाचा:

Pages