संपत्ती वाटपाच्या नियोजनात मुकेश अंबानी मग्न;जगप्रसिद्ध वॉल्टन कुटुंबाचे माॅडेल स्वीकारणार - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, November 26, 2021

संपत्ती वाटपाच्या नियोजनात मुकेश अंबानी मग्न;जगप्रसिद्ध वॉल्टन कुटुंबाचे माॅडेल स्वीकारणार

https://ift.tt/3CVyEkW
मुंबई : देशातील सर्वात प्रसिद्ध उद्योगपतींपैकी एक असलेले यांनी आपली संपत्ती मुलांमध्ये वाटण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. यासाठी त्यांनी जगातील आघाडीच्या व्यावसायिक कुटुंबांमधील संपत्ती वाटपाच्या सूत्रांचा अभ्यास सुरू केला आहे. वॉलमार्टचे संस्थापक वॉल्टन परिवारापासून ते कोच परिवाराच्या सूत्रांपर्यंत विचार करत आहेत. ब्लूमबर्गच्या एका रिपोर्टनुसार, मुकेश अंबानी यांना वॉल्टन परिवाराच्या संपत्ती विभाजनाचा फॉर्म्युला सर्वात जास्त आवडला आहे. याच आधारे मुकेश अंबानी भविष्यात त्यांची संपत्ती वारसांमध्ये विभागू शकतात. वॉल्टन कुटुंबात अशी पडली फूट वॉलमार्टचे संस्थापक सॅम वॉल्टन यांनी ते जिवंत असताना १९८८ मध्ये डेव्हिड ग्लास यांना कंपनीचे सीईओ बनवले. त्यापूर्वी ते स्वत: कंपनीचे सीईओ होते. जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबाने स्वत:ला मंडळापुरते मर्यादित केले आणि बाकीचे कामकाज व्यावसायिकांना दिले. सॅम यांचा मुलगा रॉब आणि पुतण्या स्टुअर्ट यांचाही वॉलमार्टच्या मंडळामध्ये (बोर्ड) समावेश होता. याशिवाय, त्यांच्या नातीचे पती ग्रेग पेनर यांना २०१५ मध्ये अर्कान्सास्थित कंपनी बेंटोनविलेचे अध्यक्ष बनवण्यात आले. आपल्या प्रभावाचा वापर करून सर्व पदे भागधारकांपेक्षा स्वत:कडे ठेवल्याबद्दल वॉल्टन कुटुंबावरही बरीच टीका झाली, पण या कुटुंबातील इतर अनेक सदस्यांना वॉलमार्ट व्यतिरिक्त फिलॅथ्रॉपी आणि इतर कंपन्यांमध्ये पदे देण्यात आली. त्यांच्यावर गुंतवणुकीची जबाबदारी सोपवण्यात आली. सॅम यांनी त्याच्या मृत्यूच्या ४० वर्षांपूर्वी म्हणजेच १९५३ मध्ये उत्तराधिकाऱ्याची तयारी सुरू केली होती. जी त्यांच्या चार मुलांमध्ये अॅलिस, रॉब, जिम आणि जॉनमध्ये विभागली गेली. आताही या कुटुंबाकडे वॉलमार्टचा ४७% हिस्सा आहे. याच प्रकारे रिलायन्सची विभागणी होणार? मुकेश अंबानी सॅम वॉल्टन यांच्या धर्तीवर आपली संपत्ती दोन मुले, मुलगी आणि पत्नीमध्ये विभागू शकतात. ब्लूमबर्गमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, मुकेश अंबानींना वॉल्टन फॅमिलीचा फॉर्म्युला जास्त आवडला आहे. मुकेश अंबानी हे कुटुंबाच्या मालमत्तेचे व्यवस्थापन करून त्याचे एका ट्रस्टसारख्या संस्थेत रुपांतर करण्यावर विचार करत आहेत, जे रिलायन्स समुहाचेही व्यवस्थापन करेल. याविषयी अधिकृतपणे अद्याप काहीही सांगितले गेलेले नाही. असे असू शकते रिलायन्सचे स्वरुप माध्यमातून प्रसिद्ध झालेल्या बातम्यांनुसार, मुकेश अंबानींनी पत्नी नीता अंबानी, दोन मुलगे आणि मुलगीच्या नावे नवीन संस्थेमध्ये स्टेक ठेवण्याची योजना आखली आहे. तसेच कंपनीच्या विश्वासू सल्लागारांना देखील यामध्ये समाविष्ट केले जाऊ शकते. याशिवाय कंपनीचे व्यवस्थापन आणि व्यवसाय बाह्य व्यावसायिक सांभाळतील. ज्यामध्ये कुटुंबाचा हस्तक्षेप नसेल. रिलायन्स आज रिफायनिंग आणि पेट्रोकेमिकलपासून दूरसंचार, ई-कॉमर्स आणि ग्रीन एनर्जीपर्यंतच्या व्यवसायात काम करत आहे.