श्रेयस अय्यरने ते स्वप्न पूर्ण केले; ४ वर्ष झाली वडिलांनी Whatsappचा डीपी बदलला नाही - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, November 26, 2021

श्रेयस अय्यरने ते स्वप्न पूर्ण केले; ४ वर्ष झाली वडिलांनी Whatsappचा डीपी बदलला नाही

https://ift.tt/3l9NY7Q
मुंबई: न्यूझीलंडविरुद्धच्या कानपूर येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी श्रेयस अय्यरने शतकी खेळी केली. पदार्पणाच्या सामन्यात शतक करण्याचा विक्रम श्रेयसने केला. अशी कामगिरी करणारा तो १६वा भारतीय खेळाडू ठरला आहे. पहिल्या कसोटीत भारतीय संघ जेव्हा अडचणीत होता तेव्हा श्रेयसने जडेजासोबत शतकी भागिदारी केली आणि धावसंख्या २५०च्या पुढे नेली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पहिल्याच सत्रात शतक करून विक्रम देखील केला. कानपूर कसोटीच्या आधी श्रेयसने वनडे आणि टी-२० मध्ये देशाचे नेतृत्व केले होते. पण कसोटी खेळण्याची संधी मिळण्यासाठी त्याला ४ वर्ष वाट पाहावी लागली. वाचा- श्रेयसचे वडील यांनी गेल्या चार वर्षापासून त्यांच्या Whatsappचा डीपी बदलला नाही. संतोष यांनी श्रेयसच्या हातात २०१७ साली झालेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा फोटो डीपी म्हणून ठेवला आहे. २०१७ साली श्रेयसची भारतीय संघात निवड झाली होती. पण त्याला अंतिम ११ मध्ये स्थान मिळाले नाही. तेव्हा विराट कोहली दुखापतीमुळे संघाबाहेर होता आणि श्रेयसला संघात स्थान मिळू शकले असते. पण हंगामी कर्णधार अजिंक्य रहाणेने एका अतिरिक्त गोलंदाजाला स्थान दिले. वाचा- काल जेव्हा श्रेयसने कसोटीत पदार्पण केले तेव्हा सर्वाधिक आनंद संतोष अय्यर यांना झाला. ते म्हणाले, कसोटी क्रिकेट हे खरे क्रिकेट आहे. माझी नेहमी इच्छा होती की श्रेयसने देशासाठी कसोटी क्रिकेट खेळावे. श्रेयसची आई देखील कसोटीच्या जर्सीमध्ये त्याला पाहून फार आनंदी आहे. आज माझे स्वप्न पूर्ण झाले. संतोष अय्यर यांनी त्याच्या Whatsappचा डीपी चार वर्षापासून बदलेला नाही. तो २०१७ मधील आहे. तेव्हा भारताने धर्मशाला कसोटीत ऑस्ट्रेलियाचा पराभव करून मालिका २-१ने जिंकली होती. डीपी का बदलला नाही यावर संतोष अय्यर म्हणाले, हा फोटो श्रेयसला नेहमी आठवण करून देईल की त्याला कसोटी क्रिकेट खेळायचे आहे. त्याच्या करिअरचे अंतिम लक्ष्य तेच असले पाहिजे.