आता राज्ये पेट्रोल-डिझेवरील व्हॅट कपात करणार का? केंद्र सरकार म्हणाले... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, November 4, 2021

आता राज्ये पेट्रोल-डिझेवरील व्हॅट कपात करणार का? केंद्र सरकार म्हणाले...

https://ift.tt/3GQ9wj1
नवी दिल्लीः केंद्र सकारने ऐन दिवाळीत महागाईपासून सामान्यांना दिलासा देण्याचा ( ) प्रयत्न केला आहे. केंद्र सरकारने पेट्रोलवरी उत्पादन शुल्कात ५ रुपये आणि डिझेलवरील ( ) उत्पादन शुल्कात १० रुपये कपात केली आहे. यामुळे पेट्रोल आणि डिझेल उद्या सकाळपासून स्वस्त होईल. केंद्र सरकार सध्या पेट्रोलवर ३२.९० रुपये प्रतिलिटर आणि डिझेलवर ३१.८० रुपये प्रितलिटर उत्पादन शुल्क घेत आहे. केंद्र सरकारच्या निर्णयानंतर आता पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात कपात होऊन ते २७.९० रुपये आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात होऊन ते २१.८० रुपये इतके होईल. आता राज्य सरकारे व्हॅट कपात करणार का? पेट्रोल, डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर आता केंद्र सरकारने राज्यांना आवाहन केलं आहे. राज्यांनी पेट्रोल, डिझेलवरी व्हॅटमध्ये कपात करावी, यामुळे सामान्यांना दिलासा मिळाले, असं आवाहन केंद्राने केलं आहे. वेगवेगळ्या राज्यांमध्ये २० ते ३५ टक्क्यांपर्यंत व्हॅट वसूल केला जातो. शेतकरी आता रब्बी पिकांच्या पेरणीच्या तयारीत आहेत. यामुळे पेट्रोल, डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केल्याने या निर्णयाचा सर्वाधिक हा शेतकऱ्यांना होईल, असं केंद्र सरकारचं म्हणणं आहे. केंद्र सरकारने उत्पादन शुल्कात कपात केल्याने आता राज्यांनी ठोस पाऊल उचलण्याची गरज आहे. यामुळे पेट्रोल, डिझेलचे दर आणखी कमी होण्यास मदत होईल आणि सामान्यांना दिलासा मिळेल, असं केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले. देशातील विविध राज्यांमधील २९ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचे निकाल मंगळवारी लागले. या निवडणुकीत हिमाचल प्रदेश, राजस्थान, कर्नाटकमध्ये केंद्रातील सत्ताधारी भाजपला मोठा फटका बसला आहे. पेट्रोल, डिझेलचे वाढते दर, महागाई आणि शेतकऱ्यांमधील नाराजीमुळे भाजपला फटका बसल्याचं बोललं जातंय. आता पुढच्या वर्षी म्हणजे येत्या काही महिन्यांत उत्तर प्रदेशसह ५ राज्यांच्या निवडणुका होणार आहेत. यामुळे केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात करत शेतकरी आणि जनतेतील नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केल्याचं दिसतंय. का वाढताहेत पेट्रोल, डिझेलचे दर? आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाचे दर वाढल्याने देशातही पेट्रोल, डिझेलचे दर वाढत आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाची मागणी वाढली आहे. पण मागणीच्या तुलनेत कच्च्या तेलाचा पुरेसा पुरवठा होत नसल्याने कच्च्या तेलाचे दर भडले आहेत. त्याचा फटका भारतालाही बसत आहे.