
मुंबई: प्रकरणात अभिनेता याचा मुलगा याला जवळपास एक महिना कोठडीत काढावा लागला. त्याला मुंबई हायकोर्टाने जामीन दिला असला तरी जामीन देताना कठोर अटी घातल्या आहेत. या अटींचे पालन करणे बंधनकारक असून आर्यन या अटी पाळत आहे की नाही, याबाबत महत्त्वाची माहिती आता समोर आली आहे. ( ) वाचा: ड्रग्ज पार्टी प्रकरणात आर्यन खान, त्याचा मित्र आणि मूनमून धामेचा या तिघांना एकाचवेळी जामीन मंजूर झाला. हा जामीन मंजूर करताना कोर्टाने अनेक अटी घातल्या. त्यात जामिनावर असताना तिघांनीही एकमेकांच्या संपर्कात राहायचं नाही, अशी अट कोर्टाने घातली आहे. त्यामुळे बालपणीपासूनचे मित्र असलेल्या आर्यन व अरबाज यांच्यासाठी ही मोठी परीक्षाच ठरली आहे. याबाबत अरबाजचे वडील यांनी महत्त्वाची माहिती दिली. वाचा: अस्लम मर्चंट म्हणाले,' कोर्टाने जी अट घातली आहे, त्यानुसार जामिनावर सुटल्यानंतर आता आर्यन व अरबाज या दोघांनाही एकमेकांशी कोणत्याही प्रकारे संपर्क करता येणार नाही. हे दोघांसाठीही खरंतर आव्हान आहे पण अरबाज माझ्याशी याबाबत बोलला आहे. अटींचे पालन मला करावेच लागेल, असे तो म्हणालाय. त्या नरकात कोण जाईल, त्यापेक्षा सक्तीने कोर्टाचे नियम पाळलेले बरे, असेही त्याने सांगितल्याचे अस्लम मर्चंट म्हणाले. अरबाज हा आर्यनचा जवळचा मित्र आहे आणि आर्यन अडचणीत येईल असं कोणतंही काम तो करणार नाही. म्हणूनच दोघांनीही एकमेकांपासून दूर राहण्याचे ठरवले आहे, असे मर्चंट यांनी सांगितले. वाचा: दरम्यान, क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने आर्यन खान याला ३ ऑक्टोबर रोजी अटक केली होती. त्याच्यासोबत अरबाज व मूनमूनलाही अटक करण्यात आली होती. तिघांनाही प्रथम एनसीबी कोठडी देण्यात आली होती तर नंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. आर्यनला आर्थर रोड कारागृहात ठेवण्यात आले होते. जामिनासाठी या तिघांनाही मोठी धडपड करावी लागली. एनडीपीएस कोर्टाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर तिघांनीही हायकोर्टात धाव घेतली. तिथे ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी आर्यनची बाजू मांडली. अटकेनंतर अखेर २६व्या दिवशी आर्यनसह तिघांनाही जामीन मिळाला. हा जामीन देताना कोर्टाने अनेक अटी घातल्या आहेत. जो आरोप आहे तशी कोणतीही कृती घडता नये, कोर्टाच्या कार्यवाहीबाबत कोणतेही विधान करू नये, पासपोर्ट जमा करावा, विशेष एनडीपीएस कोर्टाच्या पूर्वपरवानगीशिवाय देशाबाहेर जाऊ नये, अशा त्यातील काही अटी आहेत. वाचा: