गुरुबाळ माळी, कोल्हापूर इथेनॉलच्या दरात वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यामुळे अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांच्या अर्थकारणाचा गोडवा आणखी वाढला आहे. लिटरला ऐंशी पैसे ते दीड रूपयापर्यंत ही वाढ झाल्याने कारखान्यांना आणखी अच्छे दिन येणार आहेत. यंदा विक्रमी साखर उत्पादन होणार असल्याने त्याचे दर नियंत्रित ठेवण्यात इथेनॉलच्या वाढीव दराची मोठी मदत होणार आहे. ( are going to have better days due to increase in ) साखर उद्योग गेल्या पाच ते सहा वर्षात अडचणीत आला होता. साखरेचे दर वाढत नसल्याने कारखान्यांचा तोटा वाढत होता. पण, गेल्या सहा महिन्यापासून आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर वाढल्याने कारखान्यांना अच्छे दिन आले. सन २०१९-२० मध्ये राज्यात ११० लाख टन साखरेचे उत्पादन झाले. यावर्षी ऊसाचे क्षेत्र फारच वाढले आहे. यामुळे यंदाच्या हंगामात किमान १२२ लाख टन साखर उत्पादन होण्याची शक्यता आहे. यातून बाजारात साखर मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार असल्याने त्याचे दर पडण्याची भीती व्यक्त होत आहे. दर नियंत्रित राहण्यासाठी साखर उत्पादन काही प्रमाणात कमी करणे आवश्यक आहे. त्यामुळे साखरेला पर्याय म्ह्णून निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी त्याचे दर वाढविण्याची मागणी केली जात होती. क्लिक करा आणि वाचा- कारखान्यांच्या मागणीनुसार केंद्राने बुधवारी इथेनॉलच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय कारखान्यांना दिलासा देणारा आहे. सी हेवी पासून तयार करण्यात येणाऱ्या इथेनॉलला ९७ पैसे तर बी हेवी च्या इथेनॉलला १ रूपये ४७ पैसे वाढ करण्यात आली आहे. यामुळे इथेनॉल निर्मितीकडे कारखाने वळण्याची चिन्हे आहेत. यंदा किमान दहा ते बारा लाख टन साखर उत्पादन कमी होवून त्याऐवजी इथेनॉलची निर्मिती होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास साखरेचे दर नियंत्रित राहण्यास मदत होणार आहे. याचा फायदा साखर कारखान्यांना होणार आहे. क्लिक करा आणि वाचा- इथेनॉलचे दर सध्याचा दर वाढीव दर ४५.६९ , ४६.६६ सी हेवी ५७.६१, ५९.०८ बी हेवी राज्यातील १९७ यंदाचे साखर उत्पादन ११० लाख टन क्लिक करा आणि वाचा-