मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व अल्पसंख्याक मंत्री () यांनी आज पत्रकार परिषद घेत धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. राज्याचे विरोधी पक्ष नेते (Devendra Fadanvis) यांच्यावर गंभीर आरोप मलिक यांनी केले आहेत, फडणवीस मुख्यमंत्री असताना अंडरवर्ल्डच्या लोकांना सरकारी कमिशन, सरकारी बोर्डाचे अध्यक्ष का बनवलं?, असा सवाल नवाब मलिक यांनी केला आहे. 'मुन्ना यादव हा नागपूरचा कुख्यात गुंड आहे. त्याच्यावर हत्येपासून सगळे गुन्हे दाखल आहेत. त्याला कन्स्ट्रक्शन वर्कर बोर्डाचं अध्यक्ष का बनवलं? तुमच्या गंगेत मुन्ना यादव आंधोळ करुन पवित्र झाला का?,' असंही नवाब मलिकांनी म्हटलं आहे. वाचाः 'हैदर आझम नावाच्या एका नेत्याला मौलाना आझाद फायनान्स कॉर्पोरेशनचे अध्यक्ष बनवलं होत का? हैदर आझम बांगलादेशातील लोकांना मुंबईत आणून स्थायिक करण्याचे काम करत नाही का? आझमची दुसरी पत्नी बांगलादेशी आहे. तिची मालाड पोलिसांनी चौकशी सुरु केली. २४ परगणा पोलीस ठाण्यात कागदपत्रं पाठवण्यात आली. बंगाल पोलिसांनी कागदपत्र नबवट असल्याचं सांगितलं. मालाड पोलिसांनी खटला दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केल्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयातून फोन करुन प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला,' असा गंभीर आरोप नवाब मलिकांनी केला आहे. वाचाः 'तुमच्या इशाऱ्यांवर संपूर्ण महाराष्ट्रात पैसे उकळण्याचे काम सुरु होतं की नाही. तुमच्या कार्यकाळात अनेकांच्या बिल्डरांकडून वसुली केली जात होती की नाही?,' असे सवाल नवाब मलिकांनी केले आहेत. वाचाः