नवाब मलिक यांनी टाकला 'हायड्रोजन बॉम्ब'; फडणवीसांवर केले गंभीर आरोप - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, November 10, 2021

नवाब मलिक यांनी टाकला 'हायड्रोजन बॉम्ब'; फडणवीसांवर केले गंभीर आरोप

https://ift.tt/3bVbJv1
मुंबई: () यांच्या विरोधात 'हायड्रोजन बॉम्ब' फोडण्याची भाषा करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे अल्पसंख्याक मंत्री (Nawab Malik) यांनी आज मोठा गौप्यस्फोट केला. बनावट नोटा, बनावट पासपोर्ट, बांगलादेशी नागरिकांना संरक्षण अशा अनेक प्रकरणांचा दाखला देत मलिक यांनी फडणवीसांवर गंभीर आरोप केले. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी संबंध असलेला रियाझ भाटी देवेंद्र फडणवीसांसोबत जेवण कसा घ्यायचा?,' असा सवाल नवाब मलिक यांनी केला. मुख्यमंत्रिपदाच्या काळात फडणवीस यांनी अंडरवर्ल्डमधील काही लोकांना व कुख्यात गुंडांना खुलेआम संरक्षण दिलं होतं. त्यांना सरकारमधील पदं दिली होती, असा आरोप मलिक यांनी केला. रियाझ भाटी याचं नाव घेत मलिक यांनी फडणवीसांचे अंडरवर्ल्डच्या लोकांशी संबंध असल्याचं ते म्हणाले. 'रियाझ भाटी याला विमानतळावर दोन पासपोर्टसह पकडण्यात आलं होतं. हे अत्यंत गंभीर प्रकरण होतं. मात्र, त्या प्रकरणात रियाझ भाटी दोन दिवसांत सुटला. कारण, फडणवीसांचं त्याला संरक्षण होतं. भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमात व देवेंद्र फडणवीस यांच्या डिनर टेबलवरही रियाझ भाटी दिसायचा. रियाझ भाटी याचे दाऊद व इतर टोळ्यांशी संबंध असल्याचं सर्वांना माहीत होतं. हा रियाझ भाटी सध्या फरार आहे. तो फडणवीसांच्या इतका जवळचा कसा?,' असा सवाल मलिक यांनी केला. पंतप्रधानांच्या कार्यक्रमातही रियाझ भाटी पंतप्रधानांच्या कुठल्याही कार्यक्रमात संपूर्ण माहितीशिवाय व स्कॅनिंग केल्याशिवाय कोणालाही प्रवेश नसतो. मात्र, रियाझ भाटी पंतप्रधानांच्या कार्यक्रमातही होता. तो तिथं कसा पोहोचला? देवेंद्र फडणवीसांचा त्याच्याशी नेमका काय संबंध आहे,' असा प्रश्नही मलिक यांनी उपस्थित केला. एखादी व्यक्ती राजकीय नेत्यांसोबत सहज फोटो काढू शकते. त्याबद्दल मला काहीही म्हणायचं नाही. पण रियाझ भाटी पासपोर्ट प्रकरणातून सुटला कसा? याचं उत्तर त्यावेळी गृहमंत्री असलेल्या फडणवीसांनी द्यावं,' असं मलिक म्हणाले. राज्याच्या गृहविभागाला मी याबाबत माहिती देणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.