संजूला न्याय द्या; सोशल मीडियावर चाहत्यांनी व्यक्त केला राग - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, November 10, 2021

संजूला न्याय द्या; सोशल मीडियावर चाहत्यांनी व्यक्त केला राग

https://ift.tt/3F5bfyW
नवी दिल्ली: भारताच्या निवड समितीने मंगळवारी न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी टी-२० मालिकेसाठी संघाची घोषणा केली. भारताच्या टी-२० संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे सोपवण्यात आले आहे. १६ सदस्यांच्या संघात आयपीएलमध्ये धमाकेदार कामगिरी करणाऱ्या वेंकटेश अय्यर आणि हर्षल पटेल या खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. पण या संघात अनुभवी विकेटकीपर याच्याकडे पुन्हा एकदा पाठ फिरवण्यात आली आहे. वाचा- संजूने आयपीएल २०२१ मध्ये १४ सामन्यात ४८४ धावा केल्या होत्या. यात १ शतक आणि २ अर्धशतकांचा समावेश होता. आयपीएलच्या गेल्या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजात संजू सहाव्या क्रमांकावर होता. आयपीएलमधील या चांगल्या कामगिरीनंतर चाहत्यांना अपेक्षा होती की न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत त्याला संधी मिळेल. पण असे झाले नाही. बीसीसीआयने संघाची घोषणा केल्यानंतर सोशल मीडियावर याची प्रतिक्रिया उमटली. अनेकांनी त्यावर नाराजी व्यक्त केली. इतक नव्हे तर काही मिनिटात #JusticeForSanjuSamson हा हॅश टॅग ट्रेंड वर आला. संजू सॅमसन आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व करू करतोय. चाहत्यांनी निवड समितीवर पुन्हा एकदा भेदभाव केल्याचा आरोप केलाय. वाचा- वाचा- भारतीय संघाची घोषणा झाल्यावर एका बाजूला संजूला न्याय मिळावा अशी मागणी केली जात आहे दुसऱ्या बाजूला रोहित शर्माला कर्णधार केल्याबद्दल अभिनंदन केले जात आहे. वेंकटेश अय्यरला संधी दिल्याबद्दल अनेकांना त्याचे अभिनंदन केले. वेंकटेशने आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून शानदार कामगिरी केली होती. असा आहे भारतीय संघ- रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, इशान किशन, वेंकटेश अय्यर, युजवेंद्र चहल, आर अश्विन, अक्षर पटेल, आवेश खान, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, हर्षल पटेल आणि मोहम्मद सिराज