हा कसला जल्लोष; बुटात दारू ओतली आणि...; पाहा ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी काय केले - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, November 15, 2021

हा कसला जल्लोष; बुटात दारू ओतली आणि...; पाहा ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी काय केले

https://ift.tt/3Dh86vv
दुबई: ऑस्ट्रेलियाने रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा पराभव केला आणि टी-२० वर्ल्डकपचे विजेतेपद मिळवले. वनडे वर्ल्डकप पाच वेळा जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाला टी-२०चे विजेतेपद मिळवता आले नव्हते. टी-२० वर्ल्डकपला २००७ साली सुरुवात झाली होती. तेव्हापासून ऑस्ट्रेलियाला या विजेतेपदाची प्रतिक्षा होती. अखेर न्यूझीलंडवर ८ विकेटनी विजय मिळवून त्यांनी हा चषक नावावर केला. पहिल्या विजेतेपदानंतर ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी धमाकेदार जल्लोष केला. हा जल्लोष फक्त मैदानात, ड्रेसिंग रुममध्ये नाही तर विमानत देखील सुरूच होता. वाचा- अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाला विजयासाठी १७३ धावांची गरज होती. मिशेल मार्श आणि डेव्हिड वॉर्नर यांच्या वादळी अर्धशतकाने ऑस्ट्रेलियाला सहज विजय मिळवता आला. विजयानंतर ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी एकमेकांवर शॅम्पेन आणि बिअर ओतली. वाचा- टी-२० वर्ल्डकप सुरू होण्याआधी ऑस्ट्रेलिया संघाने सलग पाच द्विपक्षीय टी-२० मालिका गमावल्या होत्या. यात बांगलादेशविरुद्धच्या मालिकेचा देखील समावेश होता. मात्र वर्ल्डकपच्या विजयानंतर या सर्व मालिकेतील पराभवाचा बॅकलॉक त्यांनी भरून काढला. विजयानंतर ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंच्या जल्लोषाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. जल्लोषाच्या या व्हिडिओमध्ये असा देखील एक व्हिडिओ आहे. ज्यात ऑस्ट्रेलियाचा खेळाडू मॅथ्यू वेड आणि मार्कस स्टॉयनिस बुटात बिअर ओतून पीत आहेत. या दोन्ही खेळाडूंनी अजब पद्धतीने जल्लोष केला. वाचा- बुटातून बिअर का घेतली चांगले दिवस येण्यासाठी केलेल्या त्यागानंतर बुटातून बिअर पिणे हे ऐतिहासिकरित्या भाग्याचे मानले जाते. पण २०व्या शतका ही गोष्ट वाईट गोष्टीचे कारण मानली जाऊ लागली. मात्र ऑस्ट्रेलियात हा प्रकार अजून देखील लोकप्रिय आहे. तेथे त्याला शूई असे म्हटले जाते.