धक्कादायक! १० महिन्याची चिमुकली पित होती मृत आईचं दूध अन्..., काळजाचा ठोका चुकावणारी घटना - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, November 30, 2021

धक्कादायक! १० महिन्याची चिमुकली पित होती मृत आईचं दूध अन्..., काळजाचा ठोका चुकावणारी घटना

https://ift.tt/3I5nnTe
अमरावती : अमरावती येथील कृषी महाविद्यालयाच्या परिसरात सोमवारी नागपूर जिल्ह्यातील तनुश्री करलुके या ३२ वर्षीय विवाहित महिलेचा मृतदेह आढळला तर या मृतदेहाजवळ १० महिन्याची चिमुकली व एक ४ वर्षीय मुलगा जिवंत दिसून आला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत आईच्या छातीला टेकून भुकेने व्याकूळ झालेली चिमुकली रडत होती. रात्रभरापासून १० महिन्याचं बाळ थंडीत आई शेजारी मृतदेहाजवळ पडून होते. त्यामुळे पोलिसांनी अमरावती येथील सामाजिक कार्यकर्ते गुंजन गोळे यांना माहिती दिली. त्यामुळे लागलीच चिमुकल्या बाळाला गुंजन गोळे यांनी स्वतःच्या छातीजवळ घेत आपले दूध पाजले व बाळाची भूक भागवली. बाळाची भूक भागवल्यानंतर हे बाळ शांत झाले. त्यानंतर कालपासून तब्बल २४ तास गुंजन गोळे या महिलेने दोन्ही बाळाचा सांभाळ करत आईची भूमिका पार पाडली तर आज दुपारी मृत महिलेचे नातेवाईक आल्यानंतर त्या दोन्ही बाळाला नातेवाईकांच्या स्वाधीन केले गुंजन गोळे यांनी सामाजिक भान दाखवत माणुसकीचा परिचय करून दिला.