धक्कादायक! सासूवर चाकूने केले सपासप वार, जावई फरार - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, November 4, 2021

धक्कादायक! सासूवर चाकूने केले सपासप वार, जावई फरार

https://ift.tt/3wd8LeM
म.टा. प्रतिनिधी, कौटुंबिक कलहातून जावयाने चाकूने सपासप वार करून सासूला ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही थरारक घटना बुधवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास सदरमधील नवीवस्ती येथे घडली. ( escaped after his ) अंतकला विनोद मेश्राम (वय ४८) असे जखमीचे तर धर्मेंद्र शाहू (वय २९ रा. नारा) असे हल्लेखोर जावयाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धमेंद्र हा कॅटरिंगचे काम करतो. २०१५मध्ये त्याने अंतकला यांच्या मुलीशी प्रेमविवाह केला. लग्नानंतर पत्नी व त्याचे वाद व्हायला लागले. २०१७मध्ये अंतकला यांची मुलगी माहेरी आली. सासूमुळे पत्नी परत येत नसल्याचा समज धर्मेंद्रचा झाला. त्यामुळे तो अंतकला यांच्याशी वाद घालायला लागला. क्लिक करा आणि वाचा- बुधवारी दुपारी धर्मेंद्र हा अंतकला यांच्या घरी आला. त्याने अंतकला यांच्या पोटावर दोनवेळा चाकूने वार केले. अंतकला यांनी आरडा-ओरड केली. पकडल्या जाण्याच्या भीतीने धर्मेंद्र तेथून पसार झाला. घटनेची माहिती मिळताच सदर पोलिसांच्या ताफा तेथे पोहोचला. जखमी अंतकला यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून धर्मेंद्रचा शोध सुरू केला आहे. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-