नवी दिल्लीः महाराष्ट्र भाजपमधील अनेक बडे नेते दिल्लीत ( ) आहेत. महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची गुरुवारी भेट घेतली होती. आता शुक्रवारी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते यांनी अमित शहांची भेट घेतली. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल हेही दिल्लीत दाखल झाले. तर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सत्ता बदलाचा दावा केल्याने महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार का? यावरून चर्चा रंगली. अमित शहांची भेट घेतल्यानंतर फडणवीस म्हणाले... देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारात दिल्ली अमित शहांची भेट घेतली. या भेटीनंतर फडवणीस यांनी माध्यमांना माहिती दिली. कुठल्या राजकीय चर्चांना उधाण आलंय याची आपल्याला कल्पना नाही. चंद्रकांतदादा आणि मी भाजपच्या संघटनात्मक बैठकीसाठी दिल्ली आलो आहोत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. भाजपचे संघटनमंत्री बी. एल. संतोष, शिव प्रकाश सी. टी. रवी, मी आणि चंद्रकांतदाद अशी आमची बैठक झाली. एकूणच संघटनेची पुढची वाटचाल आणि त्याचा आढावा यासंदर्भात ही बैठक होती. आम्ही सकाळपासून ४ ते ५ तास त्याच बैठकीत होतो. यामुळे त्यापेक्षा वेगळा काही अडजेंडा आमचा नव्हता, असे फडणवीस यांनी सांगितले. हे आमचे नेते आहेत. यामुळे दिल्लीला आलो आणि अमित शहा असतील तर आम्ही त्यांची भेट घेतोच. यामुळे संघटनात्मक कुठलाही बदल नाही, असे फडणवीस म्हणाले. मार्चपर्यंत महाराष्ट्रात भाजपचे सरकार येईल, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलं आहे. त्यावर थेट उत्तर देणं फडणवीस यांनी टाळलं. आपण त्यांचं वक्तव्य ऐकलेलं नाही, असं फडणवीस म्हणाले. विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक १० डिसेंबरला होत आहे. या निवडणुकीत भाजपचे नेते आणि माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे मोठ्या फरकाने विजयी होतील, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.