प्रसाद रानडे । चिपळूणकोकण आणि पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणारा चिपळूण येथील () गेल्या ५ तासापासून ठप्प झाला आहे. कुंभार्ली घाटातील एका अवघड वळणावर ट्रक बंद पडल्याने वाहतुकीची कोंडी झाली असून अवजड वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. क्रेनच्या सहाय्याने हा ट्रक बाजूला करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. छोट्या कार मात्र सुरू आहेत. संबंधित क्रेनचे पैसे मालकाकडून भरून घेऊन नंतरच घटनास्थळी क्रेन येणार असल्याने हा वेळ गेल्याचे वृत्त आहे. चिपळूण-कराड मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे आहेत. यातीलच एका मोठ्या खड्ड्यात एक ट्रक अडकून पडला आहे. यामुळे गेल्या पाच ते सहा तासापासून वाहतूक पूर्णत: ठप्प आहे. घाटात रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. त्यामुळे वाहन चालक संतापले आहेत. दुधाच्या गाड्या अनेक ठिकाणी न पोहोचल्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली आहे. गेले अनेक दिवस या घाटात असलेले खड्डे बुजवावेत, अशी मागणी वाहनचालक आणि स्थानिक ग्रामस्थ करत होते. मात्र प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले होते. त्याचा मोठा फटका आज बसला आहे. आणखी वाचा: