जयंत पाटलांनी लोकलने गाठले उल्हासनगर; 'त्या' आठवणी झाल्या जाग्या - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, November 14, 2021

जयंत पाटलांनी लोकलने गाठले उल्हासनगर; 'त्या' आठवणी झाल्या जाग्या

https://ift.tt/3qPm2K7
मुंबई: पक्षाच्या कामासाठी काँँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री यांनी ते असा लोकलने प्रवास केला व सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. शनिवारी सायंकाळी जयंत पाटील लोकलने उल्हासनगरला पोहचले. सामान्य प्रवाशाप्रमाणे त्यांनी लोकलने प्रवास केला. ( ) वाचा: मुंबईमध्ये कमी वेळेत लांबचे अंतर कापायचे असेल किंवा वेळेत कुठे पोहचायचे असेल तर हा सर्वात उत्तम पर्याय ठरतो. ही बाब माहिती असल्यामुळेच रस्त्यावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी व लवकर उल्हासनगर गाठण्यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी लोकलचा पर्याय निवडला. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस गाठून उल्हासनगर येथे जाण्यासाठी लोकल पकडली. त्यानंतर लोकल प्रवासात ते शासकीय कामांचा निपटारा करताना दिसले. वाचा: पक्षाशी संबंधित कामकाजाकरिता जयंत पाटील उल्हासनगरला गेले होते. या निमित्ताने जयंत पाटील यांनी बऱ्याच दिवसांनी आपल्या सहकाऱ्यांसह लोकलने प्रवास केला. विद्यार्थी दशेत असताना जयंत पाटील हे लोकलने प्रवास करायचे. मधल्या काळातही अनेकवेळा त्यांनी लोकलने प्रवास केला आहे. शनिवारी प्रवासात सहकाऱ्यांसोबत चर्चेदरम्यान सर्व जुन्या आठवणींनाही जयंत पाटील यांनी उजाळा दिला. वाचा: