धक्कादायक! मजुराकडे आढळला हॅण्ड ग्रेनेड: पोलिसात खळबळ - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, November 28, 2021

धक्कादायक! मजुराकडे आढळला हॅण्ड ग्रेनेड: पोलिसात खळबळ

https://ift.tt/3xy2sTY
: शहरात मजुराकडे हॅण्ड ग्रेनेड आढळून आल्याने पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांनी सदर मजुराला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी सुरू केली आहे. या कारवाईबाबत पोलिसांनी प्रचंड गुप्तता बाळगली आहे. () सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी वैशालीनगर परिसरात रस्ताचं बांधकाम करण्यात आलं. रस्त्याच्या खोदकामादरम्यान एका मजुराला हॅण्ड ग्रेनेड आढळले. लोखंडी वस्तू असल्याचं समजून त्याने याबाबत कोणालाही सांगितलं नाही. ग्रेनेड घरीच ठेवले. शनिवारी हा मजूर ग्रेनेड घेऊन यशोधरानगरमधील एका भंगार विक्रेत्याकडे आला. भंगार विक्रेत्याला ते दाखवले तेव्हा भंगार विक्रेता घाबरला. त्याने लगेच यशोधरानगर पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी मजुराकडील ग्रेनेड जप्त करून त्याची चौकशी सुरू केली आहे. वैशालीनगरमधील रस्त्याच्या बांधकामादरम्यान ग्रेनेड आढळल्याचं त्याने सांगितलं. त्यानंतर पाचपावली पोलिसांना माहिती देण्यात आली. पाचपावली पोलिसांनी मजुराला ताब्यात घेतलं आणि त्याला घेऊन पोलीस वैशालीनगर परिसरात आले. बॉम्बनाशक पथकालाही बोलावण्यात आलं आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलीस आता अधिक तपास करत असून लवकरच याबाबतचा खुलासा होण्याची शक्यता आहे.