भारतीय समुद्रात चीनचा वावर वाढलाय; नौदल प्रमुखांची कबुली - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, November 26, 2021

भारतीय समुद्रात चीनचा वावर वाढलाय; नौदल प्रमुखांची कबुली

https://ift.tt/3DOKgHT
म.टा. खास प्रतिनिधी, मुंबई 'भारताचा संबंध असलेल्या समुद्रात चीनचा वावर वाढलेला आहे. अरबी समुद्रापासून ते क्षेत्रात त्यांच्या नौदलाच्या युद्धनौकांचा संचार असतो', अशी कबुली प्रमुख अॅडमिरल करमबीर सिंह यांनी गुरूवारी येथे दिली. 'आयएनएस वेळा' या पाणबुडीचा नौदलाच्या ताफ्यात समावेश करण्याच्या कार्यक्रमाप्रसंगी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. 'एडनच्या आखातात चाचेगिरीचा धोका असल्याने व्यापारी जहाजांच्या संरक्षणासाठी चीनी युद्धनौकांचा संपूर्ण अरबी समुद्रातील संचार वाढलेला आहे. या समुद्रात येण्यासाठी या नौका हिंदी महासागराचाही वापर करतात. केवळ युद्धनौकाच नाही तर त्यांच्या पाणबुड्या, टेहळणी नौकांचा तेथे वावर वाढला आहे. तसे असले तरी यामुळे कुठलेही संकट असल्यासारखी स्थिती नाही. टेहळणी विमाने, युद्धनौका आदींद्वारे नौदलाची यावर करडी नजर आहे', अशी ग्वाही नौदल प्रमुखांनी दिली. नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट झालेली 'आयएनएस वेळा' ही 'कलवरी' श्रेणीतील चौथी आहे. आणखी दोन पाणबुड्या ताफ्यात दाखल व्हायच्या आहेत. या पाणबुड्या तयार करण्याचा निर्णय २००६मध्ये झाला असताना अद्यापही त्या दाखल झालेल्या नाहीत. त्यामुळे या प्रकल्पाला विलंब झाल्याचे बोलले जाते. त्याबाबत अॅडमिरल सिंह म्हणाले, 'पाणबुड्या तयार करणे हे जटिल असते. त्यामुळे खूप विलंब झाला, असे म्हणता येणार नाही. त्यातून मागीलवर्षी करोना संकट होते. या सर्वांमधून मार्ग काढत प्रकल्प पुढे नेण्यात आला. समुद्री चाचण्या जलद करून हा विलंब दूर करण्याचा प्रयत्न नौदलाकडून युद्धपातळीवर सुरू आहे.' 'आता हरिकुमारांनी धुरा वाहावी' अॅडमिरल करमबीर सिंह हे पुढील चार दिवसांत सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्याजागी पश्चिम कमांडचे प्रमुख व्हाइस अॅडमिरल आर. हरिकुमार हे नौदल प्रमुख होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर करमबीर सिंह म्हणाले की, 'नौदलाची ताकद वाढविण्याबाबत याआधी २५ वर्षांचा कार्यक्रम निश्चित होता. मॅरिटाइम कॅपेबिलिटी पर्स्पेक्टिव्ह प्लॅन हे २५ वर्षांचे नियोजन आता दहा वर्षांवर आणले गेले आहे. आर. हरिकुमार हे आता नौदल प्रमुख होत आहेत. त्यामुळे नियोजनाची धुरा आता त्यांनी पुढे न्यावी', असे भावनिक आवाहन त्यांनी केले.