'आता मतदानासाठी फक्त मतदार कार्ड असून चालणार नाही तर...', मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांची माहिती - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, November 16, 2021

'आता मतदानासाठी फक्त मतदार कार्ड असून चालणार नाही तर...', मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांची माहिती

https://ift.tt/3FjQUWP
सिंधुदूर्ग : मतदान करण्यासाठी केवळ मतदार कार्ड असून चालणार नाही तर दि. ५ जानेवारी २०२२ रोजी प्रसिध्द होणार्या अंतिम मतदार यादीत ज्यांची नावे आहेत त्यांनाच या पुढील निवडणुकांमध्ये मतदान करता येणार आहे. त्यामुळे मतदारांनी आपले नाव मतदार यादीत आहे की नाही ते तपासावे असे आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी कुडाळ येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत घेत केले. राज्य निवडणूक आयोगाने दि. १ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत सुरू केलेल्या मतदार यादी पुनर्निरीक्षण मोहीमेत नविन मतदार नोंदणी, दावे, हरकती घेण्यात येणार आहेत असे ही त्यांनी सांगितले. यावेळी उप जिल्हाधिकारी निवडणूक अधिकारी जयकुमार फड उपस्थित होते. राज्यभर नवीन मतदान नोंदणी मोहीम दि. १ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत राबविण्यात येत आहे. सध्या ग्रामपातळीवर सुरू असलेल्या मतदार दुरुस्ती व नवमतदार नोंदणी कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर दि. १६ नोव्हेंबर रोजी राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत विशेष ग्रामसभा आयोजित करून तर नगरपरिषद किंवा नगरपंचायतमध्ये वार्ड निहाय सभा घेऊन मतदार यादीचे वाचन केले जाणार असल्याची माहीती ही देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.