नवाब मलिकांनी उघड केलं 'ते' व्हॉट्सअॅप चॅट; समीर वानखेडेंवर साधला निशाणा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, November 16, 2021

नवाब मलिकांनी उघड केलं 'ते' व्हॉट्सअॅप चॅट; समीर वानखेडेंवर साधला निशाणा

https://ift.tt/3wRsYXZ
मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे अल्पसंख्याक मंत्री () यांनी आज सकाळीच आणखी एक खळबळजनक ट्वीट केलं आहे. क्रूझ पार्टी प्रकरणातील एक व्हॉट्सअॅप चॅटचा उल्लेख करत नवाब मलिकांनी पुन्हा एकदा एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडेंना ( ) लक्ष्य केलं आहे. अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक आणि यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरूच आहे. मुंबईतील ड्रग्ज पार्टी प्रकरणात नवाब मलिकांनी आत्तापर्यंत अनेक खुलासे केले आहेत. तसंच, समीर वानखेडे यांच्यावरही धक्कादायक आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. नवाब मलिकांच्या आरोपानंतर या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. आजही नवाब मलिकांनी एका व्हॉट्सअॅप चॅटचा स्क्रीनशॉट ट्वीट केला आहे. के. पी गोसावी याच्यासोबत झालेल्या संभाषणात खबरीने काशिफ खानच्या नावाचा उल्लेख केला आहे. असं असतानाही काशिफ खानची चौकशी का करण्यात आली नाही?, असा सवाल नवाब मलिकांनी केला आहे. तर, आणि समीर वानखेडे यांच्यात काय संबंध आहेत?, असंही त्यांनी म्हटलं आहे. नवाब मलिकांच्या या ट्वीटमुळं पुन्हा एकदा हे प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे. वाचाः