चांगले रस्ते हवे? टोल द्या; गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांची भूमिका - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, November 19, 2021

चांगले रस्ते हवे? टोल द्या; गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांची भूमिका

https://ift.tt/3nsa3zU
गृहनिर्माणमंत्री डॉ. यांची भूमिका म. टा. प्रतिनिधी, ठाणेः 'मुंब्रा बायपास रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असून जोपर्यंत या रस्त्यावर टोल सुरू होत नाही, तोपर्यंत हा रस्ता चांगला होऊ शकणार नाही,' अशी भूमिका गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी मांडली. चांगल्या सोयीसुविधा हव्या असतील तर दोन पैसे जास्त मोजावे लागतील. जगात कोठेही जा. चांगले रस्ते आणि टोल यांचे जवळचे नाते आहे, असेही आव्हाड यांनी नमूद केले. कळवा-मुंब्रा भागातील वाहतूककोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी काही प्रस्तावित प्रकल्पांची पाहणी आव्हाड आणि एमएमआरडीएचे आयुक्त श्रीनिवासन यांनी गुरुवारी केली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना आव्हाड यांनी टोलविषयी महत्त्वपूर्ण विधान केले. मुंब्रा बायपास रस्त्याची कायमच दुरवस्था झालेली असते. 'जेएनपीटीमधून अहमदाबाद आणि नाशिकला जाण्यासाठी तीन रस्ते आहेत. यातील दोन रस्त्यावर टोल असून तिसरा असलेल्या मुंब्रा बायपासवर टोल नाही. दोन रस्त्यावरील टोल चुकवून वाहने मुंब्रा बायपासने जातात. त्यामुळे हा रस्ता खराब होत असून येथे टोल सुरू करण्याची मी अनेक दिवसांपासून मागणी करीत आहेत. मंत्री अशोक चव्हाण यांनी त्यास मान्यता दिली होती. टोल लागू झाला की ट्रकचालक दूरचा फेरा मारणार नाही आणि आपोआप मुंब्रा बायपासवरील वाहनांची वाहतूक कमी होईल, रस्ताही चांगला राहील, असे ते म्हणाले. 'तुम्हाला चांगले रस्तेही हवेत आणि टोलही नको, या दोन्ही गोष्टी एकत्र येऊ शकत नाहीत. मुंबई-पुणे एक्सप्रेस वे रस्त्यावर टोल असल्याने हा रस्ता चांगला आहे. एक्सप्रेसवेवर एकही खड्डा पडल्यास तात्काळ रस्त्याची दुरुस्ती केली जाते. चांगल्या सोयीसुविधा पाहिजे असतील तर दोन पैसे जास्त मोजावे लागतील. ज्या प्रमुख रस्त्यावर २४ तास वाहतूक आहे, त्याठिकाणी टोल न घेतल्यास रस्ते टिकूच शकत नाही,' असेही आव्हाड यांनी सांगितले. 'आपण कशाला बोलावे?' 'स्वातंत्र्यसंग्रमामध्ये हजारो नागरिकांचे जीव गेले. अनेक स्वातंत्र्यसैनिकांच्या सहभागाने देशाला स्वातंत्र्य मिळाले असून ते सोपे नाही. कपडे लाल झाल्याशिवाय तसेच त्यागाशिवाय स्वातंत्र्य मिळाले नाही. त्याग दिसत नसेल आणि समजत नसेल तर त्यांच्या अकलेपुढे आपण कशाला बोलावे' असा टोला आव्हाड यांनी अभिनेते विक्रम गोखले आणि अभिनेत्री कंगना रनौत यांना लगावला.