कलाबेन डेलकर यांचे मातोश्रीवर जंगी स्वागत; CM ठाकरेंच्या भेटीनंतर म्हणाल्या... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, November 4, 2021

कलाबेन डेलकर यांचे मातोश्रीवर जंगी स्वागत; CM ठाकरेंच्या भेटीनंतर म्हणाल्या...

https://ift.tt/3mGhPFM
मुंबई: लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेने महाराष्ट्राबाहेर प्रथमच यश मिळवत इतिहास रचला. लोकसभा मतदारसंघात उमेदवार यांनी भाजप उमेदवाराचा धुव्वा उडवत मोठा विजय मिळवला. या निकालाची चर्चा देशभरात होत असताना कलाबेन यांनी आज मुंबईत मातोश्री निवासस्थानी येऊन मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख यांची भेट घेतली. यावेळी रश्मी ठाकरे यांनी कलाबेन यांचे औक्षण केले. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना कलाबेन यांनी हृद्य भावना व्यक्त केल्या. ( ) वाचा: दादरा नगर हवेलीचे खासदार यांनी मुंबईत मरिन ड्राइव्ह येथील सी ग्रीन हॉटेलमध्ये आत्महत्या केली होती. त्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. डेलकर यांनी आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या सुसाइड नोटमध्ये दादरा नगर हवेलीच्या प्रशासकांवर गंभीर आरोप केले होते. मोहन डेलकर यांच्या आत्महत्येने मोठा आघात डेलकर कुटुंबावर झाला होता. या संकटाच्या वेळी शिवसेना नेतृत्वाने डेलकर कुटुंबाला धीर दिला. त्यानंतर मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर व मुलगा अभिनव डेलकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. दरम्यान, लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेने कलाबेन डेलकर यांना उमेदवारी दिली आणि एका निश्चयाने त्या लढल्या. त्यांनी भाजप उमेदवाराचा दारूण पराभव केला. शिवसेनेसाठी हा विजय अनेक अर्थांनी खास ठरला आहे. भाजपशी संघर्ष सुरू असताना राज्याबाहेर पहिला मोठा विजय मिळवून शिवसेनेने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. या विजयानंतर शिवसेनेच्या गोटात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. निकालानंतर कलाबेन डेलकर आज मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरे यांना भेटायला आल्या तेव्हा त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. वाचा: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर कलाबेन यांनी माध्यमांशी संवाद साधला. शिवसेनेने दिलेली भक्कम साथ, दादरा नगर हवेलीतील जनतेचा पाठिंबा आणि मोहन डेलकर यांची पुण्याई याच्या जोरावर मी मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाले, असे कलाबेन म्हणाल्या. डेलकर कुटुंबाने नेहमीच विकासाचे राजकारण केले आहे. यावेळी लढाई अन्यायाविरुद्ध होती आणि आम्ही ती जिंकली आहे. यापुढेही विकास हेच आमचे ध्येय असेल व त्यामार्गाने आम्ही पुढे जाणार आहोत, असे सांगताना उद्धव ठाकरे हेसुद्धा लवकरच दादरा नगर हवेलीला येणार आहेत, असे कलाबेन म्हणाल्या. अभिनव डेलकर यांनीही यावेळी प्रतिक्रिया दिली व शिवसेनेचे आभार व्यक्त केले. दादरा नगर हवेलीत लोकशाही जिंकली आहे. भाजपचे बडे नेते प्रचाराला येऊनही आम्ही मात दिली. हा ऐतिहासिक विजय आहे, असे अभिनव म्हणाले. हुकूमशाहीविरोधात माझे वडील लढत होते. ही लढाई आम्ही पुढे नेत आहोत. आमच्यासोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. येत्या काळात दमण आणि गुजरातमध्येही शिवसेना पक्षवाढीसाठी आम्ही झटून काम करणार आहोत, असे अभिनव डेलकर म्हणाले. वाचा: