RBI च्या स्पर्धेत सहभागी व्हा आणि जिंका ४० लाखाचे बक्षीस - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, November 11, 2021

RBI च्या स्पर्धेत सहभागी व्हा आणि जिंका ४० लाखाचे बक्षीस

https://ift.tt/3DjUCPX
मुंबईः भारतीय रिझर्व्ह बँक तुम्हाला आता ४० लाख रुपये जिंकण्याची संधी ( ) देत आहे. ग्राहकांचे डिजिटल पेमेंट आणखी सुरक्षित करण्यासाठी RBI पहिल्यांदाच जागतिक हॅकथॉन आयोजित करत आहे. यामध्ये तुम्हाला हे पैसे जिंकण्याची संधी मिळेल. यासाठी १५ नोव्हेंबरपासून तुम्ही नोंदणी करू शकता. आरबीआयची घोषणा आरबीआयने मंगळवारी या हॅकथॉनची घोषणा केली. या हॅकथॉनची थीम डिजिटल पेमेंट अधिक वेगवान आणि कार्यक्षम बनवणे आहे. ज्यामुळे त्यात आणखी सुधारणा करता येतील. काय करावे लागेल? या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्याची आणि त्यांचे नाविन्यपूर्ण उपाय दाखवण्याची संधी मिळेल, असे आरबीआयने म्हटले आहे. यावर एक ज्युरी असेल जी प्रत्येक श्रेणीतील विजेत्यांची निवड करेल. मिळेल ४० लाखांचे बक्षीस या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्याला ४० लाखांचे बक्षीस दिले जाणार आहे. त्याचबरोबर दुसरा क्रमांक पटकावणाऱ्या स्पर्धकाला २० लाख रुपयांचे बक्षीस मिळेल. अशी होणार विजेत्यांची निवड > रोख व्यवहार डिजिटल मोडमध्ये रूपांतरित करण्याचे नवीन आणि सोपे मार्ग शोधा > संपर्करहित किरकोळ पेमेंट सुधारण्यावर लक्ष केंद्रीत करणे > डिजिटल पेमेंटमधील प्रमाणीकरण यंत्रणेच्या इतर पद्धतींचा शोध घेणे > डिजिटल पेमेंट फ्रॉड आणि फसवणूक शोधण्यासाठी सोशल मीडिया विश्लेषण मॉनिटरिंग टूल तयार करणे