
मथुरा: उत्तर प्रदेशच्या निवडणुका जवळ येत असताना आणि ही दोन्ही ठिकाणं पुन्हा एकदा अनेक कारणांनी चर्चेत आहेत. मथुरेत विवादित स्थळी ६ डिसेंबर रोजी जलाभिषेक करण्याची घोषणा हिंदू महासभेने केल्यानंतर हा कार्यक्रम रोखण्यासाठी लगेचच पावले टाकली गेली आहेत. मथुरा जिल्ह्यात कलम १४४ लागू करण्यात आले असून हिंदू महासभेच्या पधिकाऱ्यांना घरातच नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. दरम्यान, प्रतिबंधात्मक आदेश तसेच पदाधिकाऱ्यांना नजकैद झाल्याने जलाभिषेकाचा कार्यक्रम रद्द करण्यात येत असल्याचे हिंदू महासभेने स्पष्ट केले आहे. तरीही खबरदारी म्हणून सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. ( ) वाचा: हिंदू महासभेने जलाभिषेक कार्यक्रम जाहीर केल्यानंतर मथुरेतील पोलीस प्रशासन सतर्क झालं आहे. जिल्ह्यातील सर्वच संवेदनशील ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. जिल्ह्याच्या सीमेवर कसून तपासणी करण्यात येत आहे. जलाभिषेक कार्यक्रमासाठी राष्ट्रीय अध्यक्षा आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पणती येणार होत्या. त्यांनीच या कार्यक्रमाची घोषणा केली होती. मात्र, प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून त्यांची समजूत घालण्यात आली असून त्यानंतर त्यांनी आपला प्रस्तावित कार्यक्रम रद्द केला आहे. याबाबत हिंदू महासभेकडून अधिकृत माहितीही देण्यात आली आहे. वाचा: दरम्यान, कृष्ण जन्मभूमी विवाद खटला मथुरेच्या स्थानिक कोर्टात सुरू आहे. हिंदू महासभा यात पक्षकार आहे. या खटल्याची पुढील सुनावणी १५ फेब्रुवारी रोजी होणार आहे. कृष्ण जन्मभूमीची विवादित १३.३३ एकर जमीन अखिल भारतीय हिंदू महासभेचे माजी अध्यक्ष पंडित मदनमोहन मालवीय यांनी खरेदी केली होती. शांतता राखण्याचे आवाहन मथुरेतील तणावाच्या स्थितीवरून अखिल भारतीय तीर्थ पुरोहित महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष महेश पाठक यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. काही लोक मथुरेतील वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशावेळी मथुरेतील सामान्य जनतेने शांतता भंग होऊ नये म्हणून दक्ष राहायला हवं आणि जिल्हा प्रशासनाला सहकार्य करायला हवं, असे पाठक म्हणाले. वाचा: