ओमिक्रॉनचा धोका: भारतासाठी पुढचे दोन आठवडे ठरणार महत्त्वाचे, कारण... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, December 11, 2021

ओमिक्रॉनचा धोका: भारतासाठी पुढचे दोन आठवडे ठरणार महत्त्वाचे, कारण...

https://ift.tt/3dIffK9
नवी दिल्ली: संसर्गाची दुसरी लाट नियंत्रणात आली असतानाच भारतात करोनाच्या व्हेरिएंटने एंट्री केल्याने पुन्हा भीतीचे वातावरण पसरले आहे. शुक्रवारी भारतातील ओमिक्रॉन बाधितांची संख्या ३२ वर पोहचली त्यामुळे चिंतेत अधिकच भर पडली असून ठरू शकतो, या व्हेरिएंटमुळे कोविडच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण मिळणार का?, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. याच अनुषंगाने आतापर्यंतची रुग्णवाढ लक्षात घेत महत्त्वाचे निरीक्षण आरोग्य विभागातून नोंदवण्यात आले आहे. ( ) वाचा: जगातील ५९ देशांमध्ये ओमिक्रॉनने हातपाय पसरले असले तरी या व्हेरिएंटची लागण होऊन अजून एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. भारतातही अजून तितकी गंभीर स्थिती नाही. भारतात असली तरी या रुग्णांचा तपशील पाहिल्यास एकाही रुग्णात तीव्र लक्षणे आढळून आलेली नाहीत. त्यामुळेच आरोग्य विभाग या संपूर्ण स्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे. भारतात ओमिक्रॉनचा फैलाव किती वेगाने होऊ शकतो, याचा अंदाज आताच बांधता येणार नाही. मात्र, पुढील दोन आठवड्यांत निश्चितपणे याचा अंदाज येऊ शकतो, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील सूत्रांकडून सांगण्यात आले. ओमिक्रॉन व्हेरिएंट डेल्टा व्हेरिएंटच्या तुलनेत कमी घातक आहे. मात्र, ओमिक्रॉनचा फैलाव होण्याचा वेग अधिक आहे, असे अनेक तज्ज्ञांनी याआधीच सांगितलेले आहे. ते पाहता अधिक खबरदारी घ्यावी लागणार हे निश्चित झाले आहे. वाचा: दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन धोक्याचा इशारा दिला. ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या रूपाने नवे संकट येऊ पाहत आहे. त्यामुळे आपल्याला अधिक सतर्क व्हावं लागेल. मास्कबाबत गाफिलपणा आला आहे. अनेकजण मास्कचा वापर करताना दिसत नाहीत. ही ढिलाई चालणार नाही. मास्कचा सक्तीने वापर आणि कोविडवरील लसचे दोन्ही डोस याला प्राधान्य द्यावंच लागेल, असे नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही. के. पॉल यांनी बजावून सांगितले. ओमिक्रॉनबाबतच आज (शनिवार) कॅबिनेट सचिव महत्त्वाची बैठक घेणार आहेत. या बैठकीत देशातील सध्याची स्थिती, ओमिक्रॉनचा धोका आणि आरोग्य सुविधा यावर चर्चा केली जाणार आहे. वाचा: