१०० गाड्यांच्या ताफा घेऊन MIM चा मोर्चा मुंबईकडे रवाना, परवानगीच नसल्याने वातावरण तापणार - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, December 11, 2021

१०० गाड्यांच्या ताफा घेऊन MIM चा मोर्चा मुंबईकडे रवाना, परवानगीच नसल्याने वातावरण तापणार

https://ift.tt/3yiO2XT
औरंगाबाद : मुस्लिम आरक्षणाच्या मागणीसाठी एमआयएमकडून मोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आली होती. त्याप्र माणे आज सकाळी सात वाजता औरंगाबादच्या आमखास मैदानाहून हा मोर्चा मुंबईकडे रवाना झाला आहे. या मोर्चाचे नेतृत्व एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील करत आहेत. ( MIM march leaves for Mumbai No permission from ) मुस्लिम आरक्षण आणि वफ्फ बोर्डाच्या जागांच्या संरक्षण या मागणीसाठी आपण मोर्चा काढणार असल्याचं जलील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं. त्यामुळे आज सकाळी १०० पेक्षा अधिक चारचाकी गाड्या असलेला मोर्चा घेऊन जलील मुंबई निघाले आहेत. विशेष म्हणजे एमआयएमच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी रात्रीच मुंबई शहरात कोणतेही मोर्चे, सभा, आंदोलन करता येणार नाही याचे आदेश काढले आहे. त्यामुळे आता एमआयएमचा मोर्चा मुंबईत निघणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. (Muslim reservation MIM march leaves for Mumbai No permission from Mumbai police) (Muslim reservation MIM march leaves for Mumbai No permission from Mumbai police)