माजी आमदार पुत्राच्या लग्नाची होतेय सर्वत्र चर्चा; कारण ऐकून तुम्हीही कराल कौतुक - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, December 2, 2021

माजी आमदार पुत्राच्या लग्नाची होतेय सर्वत्र चर्चा; कारण ऐकून तुम्हीही कराल कौतुक

https://ift.tt/31iQSjJ
बीडः लसीकरणाचे प्रबोधन व्हावे या साठी वेगवेगळ्या शक्कल प्रशासन लढवत असल्याचे आपण पाहिले आहे. मात्र बीडमध्ये एका लग्न सोहळयात चक्क वऱ्हाड्यांचं लसीकरण करण्यात येत आहे.तसंच, लसीकरणाचं प्रमाणपत्र असेल तरच विवाह मंडपात प्रवेश दिला जातोय. या विवाह सोहळ्याची चर्चा सध्या सर्वत्र रंगली आहे. लग्न सोहळ्यात आलेल्या नातेवाईंकांचे लसीकरण झाले नसेल तर तिथेच सोहळ्यातच लस देण्यात येते.त्यामुळे या विवाह सोहळ्याची भन्नाट चर्चा सुरू आहे. बीडचे माजी आमदार सुनील धांडे यांचे सुपुत्र आणि आणि माजी सभापती नारायण परझने यांच्या मुलीच्या विवाह सोहळयात संयोजकांनी लसीची सक्ती केली आहे. त्यामुळं या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या हस्ते या लग्न मंडपातील लसीकरणाचा शुभारंभ झाला. वाचाः लसीकरणासाठी नागरिक पुढे येत नाहीत म्हणून लग्न सोहळ्यात सहभागी होणाऱ्या प्रत्येकाच्या आरोग्यासाठी आम्ही हा उपक्रम घेत आहोत, असं मुलीचे वडील नारायण परझने यांनी सांगितले. तर यापुढे प्रत्येक लग्न समारंभा पूर्वी लसीकरणासाठी असे उपक्रम प्रशासनाकडून राबवले जातील त्याच पद्धतीने नागरिकांनीही असे समारंभ करण्यापूर्वी प्रशासनाशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक सुरेश साबळे यांनी केले. वाचाः या लग्नसमारंभात शेकडो लोकांचे लसीकरण करण्यात आले असून या लग्नसमारंभात कार्य करणारे, मंडप डेकोरेशन, ऑर्केस्टा कलावंत यांचंही लसीकरण करून घेण्यात आले आहे. या वेळेस राजकीय सामाजिक, कलाक्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. त्यांचीही चौकशी करून लसीकरणाची याठिकाणी मोहीम राबवण्यात आली आहे. या वेळेस जिल्हाभरातून या लग्नाचं सगळीकडे कौतुक केलं जात आहे. या लग्नसमारंभासाठी जिल्हाभरातून आलेल्या खेड्यापाड्यातील लोकांची देखील या माध्यमातून मोठ्या प्रमाणात लसीकरण झालं आहे . विशेष म्हणजे, लग्न समारंभात वेगवेगळे आकर्षक देखावे केले जातात मात्र, या लग्नाचं आकर्षण हे लसीकरण ठरलं आहे. वाचाः