ओमिक्रॉनवर कोविशील्ड लस प्रभावी की द्यावा लागेल बूस्टर डोस? वाचा सविस्तर - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, December 1, 2021

ओमिक्रॉनवर कोविशील्ड लस प्रभावी की द्यावा लागेल बूस्टर डोस? वाचा सविस्तर

https://ift.tt/3rpN6Q3
मुंबई : जगभरात ओमिक्रॉनच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर, भारतात कोविशील्ड लस बनवणारी कंपनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे प्रमुख आदर पूनावाला यांनीही आपले मत मांडले आहे. पूनावाला यांनी दिलेल्या माहितीनुसार, गरज भासल्यास नवीन करोना प्रकारासाठी खास बनवलेली कोविशील्ड लस बनवण्याचा विचार केला जाऊ शकतो. कोविडशील्ड लस नवीन प्रकाराविरूद्ध किती प्रभावी आहे हे येत्या २-३ आठवड्यांत कळेल. अशा परिस्थितीत, आवश्यक असल्यास, ओमिक्रॉन लक्षात ठेवून बूस्टर डोस देखील शक्य आहे. NDTV या वृत्तवाहिनीशी बोलताना आदर पूनावाला म्हणाले की, 'ऑक्सफर्ड विद्यापीठाचे शास्त्रज्ञ देखील यावर संशोधन करत आहेत. त्यांच्या संशोधनाच्या आधारे आम्ही एक नवीन लस बनवण्याचा विचार करू शकतो, जी बूस्टर डोस म्हणून काम करेल. संशोधनाच्या आधारे, आम्ही लसीचा तिसरा आणि चौथा डोस देण्याबाबत निर्णय घेण्यास सक्षम होऊ. इतकंच नाहीतर, यावेळी त्यांनी ओमिक्रॉन प्रकाराशी लढण्यासाठी विशिष्ट लस आवश्यक आहे की नाही हे देखील स्पष्ट केलं. पूनावाला म्हणाले की, 'बूस्टर डोसची आवश्यकता असल्यास, कंपनीकडे आधीच पुरेसे डोस आहेत, जे त्याच किंमतीत दिले जातील. आमच्याकडे लाखो डोस स्टॉकमध्ये आहेत. आम्ही भारतातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी २० कोटी डोस आरक्षित केले आहेत. जर सरकारने बूस्टर डोस जाहीर केला, तर आमच्याकडे पुरेशा प्रमाणात लसी आहेत. सध्या प्राधान्याने करोना लसीचा दुसरा डोस न घेणाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे' असंही ते म्हणाले.