
नवी दिल्ली: याच्यानंतर प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन याचे येथे होणारे सर्व शो रद्द करण्यात आले आहेत. या शोसाठी परवानगी नाकारण्यात आली असून खुद्द कामरा यानेच ट्वीटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे व उपरोधिक शब्दांत टीका केली आहे. पुढील २० दिवसांनंतरच्या तारखा या शोजसाठी निश्चित करण्यात आल्या होत्या. मात्र, अनेक कारणांनी हे शो चर्चेत आले व अखेर त्यासाठी परवानगी मिळू शकली नाही. ( ) वाचा: कुणाल कामरा याचे शो आयोजित केले गेल्यास संबंधित आयोजन स्थळ बंद करण्यात येईल, अशी धमकी देण्यात आली होती. या धमकीमुळेच शो रद्द करण्यात आले आहेत. त्याला परवानगी नाकारण्यात आली आहे, असे खुद्द कामरा याने नमूद केले आहे. याबाबत आहेत. अशा शोसाठी पोलीस परवानगी देत नाहीत तर ही परवानगी महापालिकेकडून दिली जाते आणि अजूनतरी आमच्याशी याबाबत कुणी संपर्क केलेला नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले. मला व्हायरसचा एक प्रकार समजतात! बेंगळुरूतील शो रद्द झाल्याने कुणाल कामराने ट्वीटरच्या माध्यमातून उपरोधिक शब्दांत निशाणा साधला आहे. 'हॅलो बेंगळुरू, तुम्हाला सांगण्यास आनंद होत आहे की, वीस दिवसांनंतर प्रस्तावित असलेले माझे सर्व शो रद्द करण्यात आले आहेत. दोन कारणांमुळे हे शो रद्द केले गेले आहेत. एक कारण म्हणजे कार्यक्रमाला ४५ जणांच्या उपस्थितीसाठी परवानगी घेण्यात आली नाही आणि दुसरे म्हणजे मी तिथे शो केला तर ते आयोजन स्थळ बंद करण्याची धमकी दिली गेली आहे', असे नमूद करत कामरा याने परवानगी नाकारण्यावरून बोचरी टीका केली. हा सगळा आणि कोविड विषयक गाइडलाइन्स याचाच जणू भाग आहे व माझ्याकडे तर व्हायरसचा एक प्रकार म्हणून पाहिले जाते, असेच मला आता वाटू लागले आहे, असे कामराने नमूद केले आहे. दरम्यान, मुनव्वर फारूकी याचाही शो धमकीमुळे रद्द करण्यात आला होता. त्यावर त्यानेही सोशल मीडियातून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत द्वेष जिंकला आणि कलाकार हरला, असे नमूद केले होते व या प्रकाराचा निषेध केला होता. वाचा: