देशाचे नवे संरक्षण दल प्रमुख कोण?; मराठी अधिकाऱ्याचे नाव आघाडीवर - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, December 10, 2021

देशाचे नवे संरक्षण दल प्रमुख कोण?; मराठी अधिकाऱ्याचे नाव आघाडीवर

https://ift.tt/3GADTZT
नवी दिल्ली: जनरलबिपीन रावत यांच्या अपघाती निधनाने हे अत्यंत महत्त्वाचे पद रिक्त झाले आहे. हे पद अधिक काळ रिक्त न ठेवता तातडीने त्यासाठीची प्रक्रिया सुरू केली जाणार असून पुढील काही दिवसांत देशाला नवा संरक्षण दल प्रमुख (चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ) मिळेल, असे सूत्रांनी सांगितले. या पदासाठी देशाचे सध्याचे लष्करप्रमुख असलेले मराठमोळे अधिकारी यांचे नाव सर्वात आघाडीवर आहे. ( ) वाचा: तामिळनाडूतील कुन्नूर येथे बुधवारी भारतीय हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या दुर्घटनेत यांचे निधन झाले. रावत यांच्या अपघाती निधनाने देशावर मोठा आघात झाला आहे. त्याचवेळी रावत यांच्या निधनाने देशासाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले संरक्षण दल प्रमुख पद रिक्त झाल्याने त्याजागी नवी नियुक्ती करण्यासाठी केंद्र सरकारला तातडीने पावले उचलावी लागणार आहेत. ही प्रक्रिया लगेचच सुरू करून पुढील काही दिवसांत यावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. सैन्यदलाचा प्रमुख निवडण्यासाठी जी प्रक्रिया असते तशीच प्रक्रिया संरक्षण दल प्रमुख पदाच्या नियुक्तीसाठी असेल. सर्वप्रथम सरकार तिन्ही सैन्यदलांतील वरिष्ठ कमांडर्सची एक समिती बनवेल. ही समिती दोन ते तीन दिवसांत शिफारस करेल. त्याला संरक्षण मंत्री यांची मंजुरी मिळाल्यानंतर संभाव्य नावे विचारार्थ मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीकडे पाठविली जातील. ही समितीच देशाचा पुढचा संरक्षण दल प्रमुख कोण असेल, यावर अंतिम निर्णय घेईल, असे या विषयातील जाणकारांचे म्हणणे आहे. वाचा: सध्याच्या घडीला लष्करप्रमुख जनरल नरवणे यांची या पदावर नियुक्ती करणे संयुक्तिक ठरेल, असे सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तिन्ही सैन्यदलांच्या प्रमुखांची सेवाज्येष्ठता पाहता नरवणे हे सर्वात ज्येष्ठ आहेत. पाच महिन्यांनंतर नरवणे निवृत्त होणार आहेत. त्याचवेळी नरवणे यांनी लष्करप्रमुख म्हणून सक्षमपणे कार्यभार सांभाळला आहे. पूर्व लडाखमधील स्थिती त्यांनी चांगल्याप्रकारे हाताळली. या त्यांच्यासाठी जमेच्या बाजू मानल्या जात आहेत. दुसरीकडे हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल आणि नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल आर. हरी कुमार यांचा विचार करता चौधरी यांनी दोनच महिन्यांपूर्वी ३० सप्टेंबर रोजी तर हरी कुमार यांनी गेल्या महिन्यात ३० नोव्हेंबर रोजी पदाची सूत्रे स्वीकारली आहेत. ते पाहता नरवणे हे पुढचे सीडीएस असतील ही शक्यता अधिक आहे. वाचा: