Maharashtra News LIVE : हायकोर्ट परिक्षेत गोंधळ, अभिजीत दीपकेंकडून एक आठवड्याचा अल्टीमेटम - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, August 17, 2026

Maharashtra News LIVE : हायकोर्ट परिक्षेत गोंधळ, अभिजीत दीपकेंकडून एक आठवड्याचा अल्टीमेटम

Maharashtra News LIVE : हायकोर्ट परिक्षेत गोंधळ, अभिजीत दीपकेंकडून एक आठवड्याचा अल्टीमेटम

हायकोर्टाच्या लिपिक परीक्षेवरुन काल मोठा गोंधळ झाला. काही ठिकाणी सर्व्हर डाऊन होते, काही ठिकाणी किबोर्ड खराब होता. त्यामुळे परीक्षेला बसलेल्या मुलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. विद्यार्थ्यांनी या विरोधात छत्रपती संभाजीनगरसह राज्याच्या विविध भागात आंदोलन केलं. कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके हे सुद्धा या आंदोलनात उतरले. अखेर रात्री हायकोर्टाने या आंदोलनाची दखल घेत नोटीस जारी केली. अभिजीत दीपके यांनी सरकारला इशारा दिला आहे. आठवड्याभरात विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर निर्णय घेतला नाही तर तर संभाजीनगरातच आंदोलनाला बसू असा इशारा अभिजीत दिपके यांनी दिला आहे. “परीक्षेत गडबड झाली होती. कुठे माऊस काम करत नव्हते, कुठे कीबोर्ड काम करत नव्हते. आज विद्यार्थी आंदोलनाला बसले होते, या आंदोलनाचं सगळ्यात मोठे यश आहे की कोर्टाने त्याची दखल घेतली आहे” असं दीपके म्हणाले.