
कुलगाम: जिल्ह्यात राजपूत व्यक्तीची दहशतवाद्यांकडून हत्या झाल्यानंतर काश्मीरमध्ये अल्पसंख्य असलेल्या या समाजामध्ये दहशत आणि अस्थिरता निर्माण झाली आहे. सोडून सुरक्षित ठिकाणी जाण्याचा ते विचार करीत आहेत. भागात राजपूत वाहनचालकाची दहशतवाद्यांनी बुधवारी रात्री हत्या केली होती. ( Updates ) वाचा : (वय ५०) यांच्या हत्येने दहशतीचे वातावरण पसरले आहे. सिंह यांच्या निवासस्थानी गुरुवारी अत्यंत भीषण अशी स्थिती होती. सिंह यांच्या मुस्लिम शेजाऱ्यांनाही या घटनेमुळे मोठा धक्का बसला आहे. सिंह यांच्या हत्येसाठी दहशतवाद्यांनी ‘ इफ्तार ’ची वेळ निवडली होती. त्यांच्या शेजारी राहणारे मुस्लिम बांधव रमजान निमित्त मशिदीमध्ये प्रार्थना करण्यासाठी गेले होते. ‘आम्ही कुणीही काहीही जेवलो किंवा खाल्ले नाही. पूर्ण गाव दु:खी आहे. सिंह अतिशय उमदे व्यक्तिमत्त्व होते,’ अशी भावना त्यांचे शेजारी अब्दुल रेहमान यांनी व्यक्त केली. काश्मीर खोऱ्यातील राजपूत समाजातील कुटुंबीयांबरोबरील सलोख्याचे बंध कसे जपले आहेत, यावर गावकऱ्यांनी भावना व्यक्त केल्या. ‘सतीशकुमार खासगी लोड कॅरिअर ड्रायव्हर म्हणून काम करीत होते. सतीश यांनी कुणालाही कधीही इजा पोहोचवली नाही. घटना घडली तेव्हा मी तेथेच होतो. मुलीला मोबाइल देण्यासाठी वर गेलो असताना मी गोळीबाराचा आवाज ऐकला,’ असे सतीशकुमार यांचे छोटे बंधू बिटू सिंह म्हणाले. सतीश यांच्यामागे आई, पत्नी आणि सहा ते १५ वयोगटांतील तीन मुली आहेत. सिंह यांचे कुटुंब तीन पिढ्या काश्मीर खोऱ्यात राहत आहे. १९९०च्या दशकात दहशतवादी घटनांना सुरुवात झाल्यानंतरही ते या ठिकाणाहून दुसरीकडे स्थलांतरित झाले नाहीत. वाचा : काश्मीर खोऱ्यात हिंदूंनी येथून निघून जावे, असे पोस्टर लावले आहेत. त्याचा आधार त्यांनी दिला आणि सिंह कुटुंबीय काश्मीरमधून बाहेर पडण्याच्या विचारात असल्याची प्रतिक्रिया दिली. उत्तर काश्मीरमध्ये बारामुल्ला जिल्ह्यात वीरान गावात धमकीचे एक पत्र वितरीत होत आहे. ‘ ’ या अज्ञात दहशतवादी संघटनेने काश्मीर खोऱ्यात सध्या राहत असलेल्या पंडितांना धमकावले आहे. या प्रकरणी तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. वाचा :