
परभणी: जिंतूर शहरातील अण्णाभाऊ साठे चौकात कळमनुरी औरंगाबाद या बस चालकाला धावत्या बसमध्येच आल्याने बस थेट निळकंठ हॉटेल समोरील नागरिक व वाहनावर जाऊन झाडाला धडकल्याने मोठा अनर्थ टळला असून या अपघातात चालकासह तीन ते चार प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत .तर अपघातामध्ये वाहनाचे मोठे नुकसान झाले असल्याची घटना १५ एप्रिल रोजी घडली आहे. (the of the speeding bus got dizzy and the bus had an in of parbhani) क्लिक करा आणि वाचा- याबाबत अधिक माहिती अशी की, जिंतूर शहरातील बसस्थानकातून औरंगाबाद वरून कळमनुरी जाणारी बस प्रवाशांना घेऊन बस चालक दादाराव संभाजी धनवे (वय ५० रा.वाई ता.कळमनुरी जि.हिंगोली) बस क्रमांक MH 13 CU 7543 ही बस दिनांक १५ एप्रिल रोजी सकाळी दहाच्या सुमारास ४० ते ४५ प्रवासी घेऊन कळमनूरीकडे निघाले. ही बस शहरातील अण्णाभाऊ साठे चौकात आली असता बस चालकाला अचानक भोवळ आल्याने त्याचा बसवरील ताबा सुटला. यावेळी बस निळकंठ हॉटेल समोर उभ्या असलेल्या नागरीक व वाहनांना ठोकरून थेट झाडावर जाऊन आदळली. क्लिक करा आणि वाचा- यावेळी अचानक झालेल्या प्रकारामुळे एकच गोंधळ उडाला. आजूबाजूला उभे असलेले नागरिक बाजूला झाले. मात्र यात बसचालक दादाराव धनवे व प्रवाशी सुजाता श्रीकांत बोकसे (वय २७), तुळशीराम चंपतराव तारे (वय ५० वर्षे), श्रृती गजानन तारे (वय १४ वर्षे) हे जखमी झाले. यावेळी जखमींना नागरिकांनी तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन व आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावर भेट देऊन पाहणी केली. घटनास्थळावर उभ्या असलेल्या चारचाकी व दुचाकी वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. क्लिक करा आणि वाचा-