पुण्यात धक्कादायक घटना; पाच दरोडेखोर पहाटे घरात घुसले आणि... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, April 26, 2022

पुण्यात धक्कादायक घटना; पाच दरोडेखोर पहाटे घरात घुसले आणि...

https://ift.tt/zsKB583
पुणे: पुण्यातील परिसरातील पांढरस्थळ वस्तीमध्ये सोमवारी पहाटे पाच दरोडेखोरांनी एका घरावर सशस्त्र दरोडा टाकला. एका महिलेवर वार करून कानातील सोन्याचे दागिने ओरबडून नेले. यामध्ये महिला जखमी झाली आहे. याप्रकरणी लोणीकाळभोर पोलीस स्टेशनमध्ये दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ( ) वाचा : बेबी महादेव उर्फ बळी कांचन (वय ४६, रा. पांढरस्थळवस्ती , ता. हवेली ) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पांढरस्थळ वस्ती येथे व महादेव तुकाराम कांचन (वय ५२ ) हे दाम्पत्य राहते. रविवारी रात्री ते स्वयंपाक घराच्या शेजारील खोलीमध्ये झोपले होते. सोमवारी पहाटेच्या सुमारास पाच दरोडेखोरांनी खिडकीतून आत प्रवेश केला. घरात झोपलेल्या कांचन दाम्पत्यांना झोपेतून उठविले व त्यांना चाकूचा धाक दाखवून पैसे व दागिने काढून देण्यास सांगितले. घरातील साहित्याची उलथापालथ करीत घरात पैसे व दागिने शोधण्याचाही त्यांनी प्रयत्न केला. तसेच, कांचन दांपत्याला मारहाण केली. पण, दरोडेखोरांना काहीही हाती न लागल्याने त्यांनी कांचन यांना चाकूच्या धाकाने कानातील व गळ्यातील दागिने ओरबाडून घेतले. या झटापटीत महिलेच्या दोन्ही हातावर चाकूने वार झाले. यावेळी महिलेने आरडा-ओरडा केल्याने दरोडेखोर पसार झाले. वाचा : दरम्यान, कांचन यांच्या घरावर दरोडा टाकण्यापूर्वी या पाच जणांनी परिसरातील आणखी एका ठिकाणी दरोड्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. या घटनेची माहिती मिळताच परिमंडळ पाचच्या , लोणी काळभोरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस तपास करत आहेत. वाचा :