गरम पाणी दिले नाही म्हणून सासऱ्याने केला सुनेचा खून; कोर्टाने दिली जन्मठेपेची शिक्षा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, April 14, 2022

गरम पाणी दिले नाही म्हणून सासऱ्याने केला सुनेचा खून; कोर्टाने दिली जन्मठेपेची शिक्षा

https://ift.tt/BoYMObe
कोल्हापूर: सुनेने सासूला आंघोळीसाठी गरम पाणी दिले नाही म्हणून सासऱ्याने रागाच्या भरात सुनेचा केला. या खुनाच्या गुन्ह्याच्या खटल्यात जिल्हा व सत्र न्यायाधीश बी. डी. शेळके यांनी आरोपी पांडुरंग दशरथ सातपुते (वय ७४, रा. मल्हारपेठ ता. पन्हाळा) याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. (the district court sentenced the father in law to for taking the life of daughter in law away) क्लिक करा आणि वाचा- या खटल्याची माहिती अशी की, पन्हाळा तालुक्यात मल्हारपेठ येथे सातपुते कुटुंबीय राहते. या कुटुंबातील सून शुभांगी रमेश सातपुते यांनी १४ फेब्रुवारी २०१८ रोजी सकाळी साडेसात वाजता सासू शांताबाई सातपुते यांना अंघोळीसाठी लवकर पाणी दिले नाही म्हणून त्यांचा सासरा पांडुरंग सातपुते यांनी जाब विचारला. त्यानंतर चिडलेल्या पांडुरंग सातपुते यांनी सून शुभांगी सातपुते हिला लोखंडी पारळीने डोक्यात, हातावर आणि पायावर वार केले. तसेच आईला सोडवण्यास आलेल्या मयुरेश आणि तनिष्का यांनाही लोखंडी पारळीने मारहाण केली. क्लिक करा आणि वाचा- या हल्ल्यात शुभांगी सातपुते ठार झाल्या. या घटनेनंतर कळे पोलीस ठाण्यात शुभांगी यांचे पती रमेश सातपुते यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी पांडुरंग सातपुते याला अटक करून त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित देसाई यांनी तपास करून आरोपपत्र कोर्टात सादर केले. न्यायाधीश शेळके यांच्यासमोर सुनावणी झाली. सरकारी वकील सुजाता इंगळे यांनी बारा साक्षीदार तपासले. फिर्यादी रमेश सातपुते, मुले मयुरेश आणि कनिष्का यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. कोर्टापुढे सादर केलेले पुरावे आणि सरकारी वकिलांचा युक्तिवाद म्हणून कोर्टाने आरोपी पांडुरंग सातपुते याला जन्मठेपेची शिक्षा आणि पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला. क्लिक करा आणि वाचा-