
नवी मुंबई: भारताचा स्टार ऑलराउंडर ज्याच्या कामगिरीवर गेल्या काही महिन्यांपासून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते, त्या (all-rounder )ने आज गुरुवारी झालेल्या सामन्यात सर्व टीकाकारांची तोंड बंद केली. राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात कर्णधार हार्दिकने फलंदाजी, गोलंदाजी आणि फिल्डिंगद्वारे संघाला शानदार विजय मिळवून दिला. डीवाय पाटील मैदानावर झालेल्या सामन्यात गुजरात ()ने राजस्थानचा ३७ धावांनी पराभव केला आणि गुणतक्त्यात अव्वल स्थानी झेप घेतली. हार्दिकने प्रथम नाबाद ८७ धावा केल्या, त्यानंतर त्याने एक धावबाद आणि १ विकेट देखील घेतली. वाचा- विजयासाठी १९३ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या राजस्थान रॉयल्सची सुरूवात अतिशय खराब झाली. सलामीवीर जोस बटलरने एकट्याने २८ धावा केल्यानंतर दुसरा सलामीवीर देवदत्त पडिक्कलला पहिला चेंडू खेळण्यास मिळाला आणि तो शून्यावर बाद झाला. त्याच्या जागी संघाने आर अश्विनला फलंदाजीला वरच्या क्रमांकावर पाठवले. मात्र हा प्रयोग देखील फसला. अश्विन ८ धावांवर माघारी परतला. त्याला लॉकी फर्ग्युसनने बाद केले. अश्विन बाद झाला तेव्हा बटरलच्या स्फोटक फलंदाजीमुळे राजस्थानने अर्धशतक पार केले होते. अश्विनच्या जागी कर्णधार संजू सॅमसन आला. शानदार फॉर्ममध्ये असलेल्या बटरलने २३ चेंडूत ५० धावा केल्या. गुजरातसाठी धोकादायक ठरणाऱ्या बटरलला लॉकीने ५४ धावांवर बाद केले आणि विजयाच्या मार्गातील मोठा अडथळा दूर केला. त्यानंतर हार्दिक पंड्याने संजूला ११ धावांवर धावबाद केले. कर्णधार बाद झाला तेव्हा राजस्थानच्या ४ बाद ७४ धावा झाल्या होत्या. वाचा- आयपीएलमध्ये पहिली मॅच खेळणाऱ्या यश दयालने रेसी डुस्सेनला माघारी पाठवत राजस्थानला पाचवा धक्का दिला. सामना राजस्थानच्या हातातून निसटत असताना शिमरॉन हेटमायर गोलंदाजांवर तुटून पडला. शमीने हेटमायरला २९ धावांवर बाद केले. त्याने १७ चेंडूत १ षटकार आणि २ चौकार मारले. हेटमायर बाद झाल्याने गुजरातने सामन्यावर मजबूत पकड मिळवली. हेटमायरनंतर रियान पराग (१८) आणि जेम्स नीशम (१७) यांनी विजयासाठी प्रयत्न केला. पण मोठे शॉट खेळण्याच्या प्रयत्नात ते बाद झाले. राजस्थानला २० षटकात ९ बाद १५५ धावा करता आल्या. वाचा- ... त्याआधी राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. गुजरातची सुरूवात खराब झाली. सलामीवीर मॅथ्यू वेडने ६ चेंडूत ३ चौकारांसह १२ धावा केल्या. पण ते दुसऱ्या षटकात धावाबाद झाला. त्यानंतर विजय शंकरला कुलदीप सेनने २ धावांवर माघारी पाठले. १५ धावांवर २ विकेट अशी परिस्थितीत कर्णधार हार्दिक पंड्या मैदानात आला. त्याने सलामीवीर शुभमन गिलसोबत डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला. पण रियान परागने धोकादायक गिलला १२ धावांवर बाद केले. त्याच्या जागी आलेल्या अभिनव मनोहरने पंड्या सोबत चौथ्या विकेटसाठी ८६ धावांची भागिदारी केली. युजवेंद्र चहलने अभिनवला बाद करून ही जोडी फोडली. अभिनवने २८ चेंडूत ३ षटकार आणि ४ चौकारांसह ४३ धावा केल्या. दरम्यान दुसऱ्या बाजूने हार्दिक गोलंदाजांवर तुटून पडला होता. त्याने ३६ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. गुजरातने १० षटकात ७२ धावा केल्या होत्या. मात्र हार्दिकच्या आक्रमक फलंदाजीने धावांचा वेग वाढला. अभिनवच्या जागी आलेल्या डेव्हिड मिलरने अखेरच्या षटकात जोरदार फलंदाजी केली. वाचा- हार्दिकने ५२ चेंडूत नाबाद ८७ धावा केल्या. यामध्ये ४ षटकार आणि ८ चौकार मारले. तर मिलरने १४ चेंडूत नाबाद ३१ धावा केल्या. हार्दिकने आयपीएलच्या इतिहासात प्रथम एका पाठोपाठ एक दोन अर्धशतक केली. हार्दिकची आयपीएलमधील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च खेळी आहे. याआधी त्याने कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध २०१९ मध्ये ३४ चेंडूत ९१ धावा केल्या होत्या.