
जळगाव: मिळावे या मागणीसाठी भाजपची राज्यभरात आंदोलने सुरू आहेत. यावरून राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. हा पक्ष या आंदोलनांच्या माध्यमातून एक प्रकारे ओबीसींच्या नावावर पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, असे करण्यापेक्षा त्यांना त्यांच्या हक्काचे आरक्षण द्यावे मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपला लगावला आहे. (minister criticizes over obc political reservation issue) शिवसंपर्क अभियानाबाबत जळगावात शिवसेनेच्या आमदारांसह पदाधिकाऱ्यांची बैठक सोमवारी पार पडली. या बैठकीनंतर पार पडलेल्या पत्रकार परिषदेत मंत्री गुलाबराव पाटील बोलत होते. क्लिक करा आणि वाचा- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्याकडून महाविकास आघाडीत मिठाचा खडा टाकण्याचे काम झाले तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्या मिठाच्या खड्यापासून साखर करतील, असा टोलाही यावेळी पाटील यांनी लगावला. एकनाथ खडसे आणि चंद्रकांत पाटील यांच्यातील राजकीय वैमनस्य पाहता त्यांच्यात शाब्दिक वाद होतच राहतील आणि खडसेंनी डिवचल्याशिवाय चंद्रकांत पाटील चांगले काम करणार नाहीत, अशा शब्दात त्यांनी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांना डिवचले. क्लिक करा आणि वाचा- 'खुद बेईमान दूसरों को बेईमान बोलता है'; नारायण राणेंवर टीका मंत्री गुलाबराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावरही तोफ डागली. शिवसेना पक्ष हा बाळासाहेबांच्या विचाराचा पक्ष राहिलेला नाही अशी टीका नारायण राणे यांनी केली होती. नारायण राणे यांच्या टीकेचा ही मंत्री गुलाबराव पाटील यांनी जोरदार समाचार घेतला. नारायण राणे हेच आता बाळासाहेबांचे राहिले नाहीत, असे सांगत खुद बेईमान दुसरों को बेईमान बोलता है, अशा खोचक शब्दात त्यांनी नारायण राणे यांना टोला हाणला. राणे यांनी आधी स्वतःची इमानदारी तपासून पाहावी व त्यानंतर दुसऱ्यांना बेईमान म्हणावे, असेही ते म्हणाले. क्लिक करा आणि वाचा-