मोठी बातमी... मुंबईच्या संघातून अर्जुन तेंडुलकर बाहेर, संघाबाहेर काढण्याचे कारण अस्पष्ट - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, May 24, 2022

मोठी बातमी... मुंबईच्या संघातून अर्जुन तेंडुलकर बाहेर, संघाबाहेर काढण्याचे कारण अस्पष्ट

https://ift.tt/uElvL0o
मुंबई : मुंबईच्या चाहत्यांना अर्जुन तेंडुलकर नेमका कधी खेळणार, याची उत्सुकता लागलेली होती. पण आता तर अर्जुन हा मुंबईच्या संघातून बाहेर गेल्याचे समोर आले आहे. मुंबई इंडियन्सच्या संघाने गेल्यावर्षी २० लाख एवढी किंमत मोजून अर्जुनला आपल्या संघात स्थान दिले होते. पण त्याले गेल्या हंगामात एकही संधी दिली नाही. त्यानंतर या वर्षी झालेल्या मेगा लिलावातही अर्जुनला २० लाख रुपये मोजत मुंबई इंडिययन्सच्या संघाने आपल्या ताफ्यात दाखल केले होते. या हंगामात तर मुंबई इंडियन्सचा संघ सलग ९ सामने पराभूत झाला होता आणि त्याचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले होते. त्यानंतर मुंबईच्या संघाने बरेच प्रयोग केले आणि युवा खेळाडूंना संधी दिली. पण यावेळी त्यांनी अर्जुनला एकदाही खेळण्याची संधी दिली नाही. अर्जुनचे सराव करतानाचे व्हिडिओ चांगलेच व्हायरल होत होते, पण त्याला खेळण्याची एकही संधी दिली नाही. त्यामुळे अर्जुन ट्रोल होत असल्याचेही पाहायला मिळाले होते. त्यामुळे आता पुढच्या मोसमात तरी मुंबई इंडियन्स अर्जुनला संधी देणार की नाही, अशी जोरदार चर्चा सुरु होती. आयपीएलच्या साखळी फेरीतील सामने आता संपले आहेत, त्यानंतर मुंबईच्या रणजी संघाने आपली टीम जाहीर केली आहे. रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेचे आता बाद फेरीचे सामने रंगणार आहेत. या बाद फेरीसाठी भारताचे माजी वेगवान गोलंदाज सलील अंकोला यांच्या निवड समितीने आज मुंबईचा संघ जाहीर केला. या संघात अर्जुनला संधी दिली नसल्याचे समोर आले आहे. गेल्या वेळी मात्र तो मुंबईच्या रणजी संघाचा भाग होता. मुंबईचा रणजी संघ : पृथ्वी शॉ (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, भुपेन लालवानी, अरमान जाफर, सर्फराझ खान, सुवेद पारकर, आकर्षित गोमेल, आदित्य तरे, हार्दिक तामोरे, अमन खान, साईराज पाटील, शम्स मुलानी, द्रुमिल मटकर, तनुश कोटियन, शशांक अतार्डे, धवल कुलकर्णी, तुषार देशपांडे, मोहित अवस्थी, रॉयस्टन डायस, सिद्धार्थ राऊ, मुशीर खान.