
मुंबई : मनसे अध्यक्ष (Raj Thackeray) यांना आलेल्या धमकीबाबत मुख्यमंत्री () आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांमध्ये () चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. गेले काही दिवस राज्यातील वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न झाल्याने राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवरही मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांची येत्या १४ तारखेला बीकेसीतील मैदानावर भव्य सभा पार पडणार आहे. या सभेच्या अनुषंगाने देखील चर्चा झाल्याची माहिती कळते आहे. राज ठाकरेंना धमकी, मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांमध्ये चर्चा यांनी संध्याकाळी ७ वाजताच्या सुमारास वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत प्रामुख्याने राज ठाकरे यांना आलेल्या धमकीबाबत चर्चा झाली. याअगोदर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली होती. या भेटीत नांदगावकर आणि गृहमंत्री वळसे पाटलांमध्ये दीर्घ चर्चा झाली. यानंतर आज वळसे पाटलांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन संबंधित विषयावर सखोल चर्चा केल्याची माहिती आहे. याबाबतचं वृत्त एबीपी माझाने दिलं आहे. सभेच्या नियोजनासाठी पोलिसांचा बंदोबस्त कसा? मुख्यमंत्र्यांकडून आढावा दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची येत्या १४ तारखेला बीकेसीतील मैदानावर भव्य सभा पार पडणार आहे. या सभेला जवळपास ५० हजार शिवसैनिक येणार असल्याची माहिती आहे. याच पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था कशी असणार आहे? सभेच्या नियोजनासाठी पोलिसांची व्यवस्था कशी असणार आहे? याचीही माहिती मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री वळसे पाटलांकडून घेतली. राज ठाकरेंना धमकीचं पत्र, नांदगावकरांनी घेतली गृहमंत्र्यांची भेट दरम्यान मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली. राज ठाकरे यांना जीवे मारण्याच्या धमकीचं पत्र आलं असल्याचं बाळा नांदगावकरांनी सांगितलं. राज ठाकरेंना धमकीचं पत्र माझ्याजवळ आल्याची माहिती बाळा नांदगावकर यांनी यावेळी दिली आहे. या धमक्यांबाबत माहिती देण्यासाठीच नांदगावकर यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली. हे पत्र कोणी लिहलं, कुठून आलं याबाबत सध्या काहीही माहिती नाही असे नांदगावकरांनी सांगितले. माझं ठिक आहे, पण राज ठाकरेंच्या केसालाही धक्का लागला तर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल असे त्यांनी यावेळी सांगितले.