साखरेवरील निर्यात बंदीमुळे ग्राहकांना दिलासा, कारखानदार मात्र अस्वस्थ - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, May 27, 2022

साखरेवरील निर्यात बंदीमुळे ग्राहकांना दिलासा, कारखानदार मात्र अस्वस्थ

https://ift.tt/n1v5mdH
गुरुबाळ माळी, कोल्हापूर देशात एकीकडे अतिरिक्त होत असताना केंद्र सरकारने अचानक खुल्या निर्यातीवर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे. निर्यात नियंत्रित करण्याच्या या निर्णयाने साखरेच्या दरवाढीला ब्रेक लागणार असल्याने त्यांना दिलासा मिळणार आहे, पण दुसरीकडे उत्पादित साखर खपवायची कशी या प्रश्नाने अस्वस्थ झाले आहेत. तिसरीकडे मात्र ठरलेली एफआरपी मिळणार असल्याने ऊस उत्पादकांवर तुर्त तरी कोणताच परिणाम होण्याची चिन्हे नसली तरी कारखाने अडचणीत आल्यास त्याचा फटका उत्पादकांना भविष्यकाळात सहन करावा लागण्याची शक्यता आहे. ( by the export ban on ) यंदा देशात प्रथमच विक्रमी म्हणजे जवळजवळ ३९० लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. यामुळे अतिरिक्त साखरेचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता होती. मात्र, तब्बल ९० लाख टन निर्यात आणि ३५ लाख टन इथेनॉल निर्मितीमुळे कारखान्यांना दिलासा मिळाला. साखरेचे दर नियंत्रित राहिले. यंदाही ऊस क्षेत्र अधिक असल्याने पुढील हंगामतही साखरेचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होण्याची चिन्हे आहेत. ही परिस्थिती असतानाच केंद्राने अचानक निर्यात बंदीचा निर्णय घेतला. यामुळे साखर कारखानदार अस्वस्थ झाले आहेत. शिल्लक साखर खपवावयची कुठे असा प्रश्न त्यांना पडला आहे. क्लिक करा आणि वाचा- केंद्राने प्रत्यक्षात निर्यात बंदीचा निर्णय घेतला नसला तरी निर्यातीवर नियंत्रण आणले आहे. पुढील वर्षी साधारणता शंभर लाख टन साखरेचे निर्यात होण्याची शक्यता आहे. त्यापेक्षा अधिक निर्यात होणार नाही. यामुळे त्याचा फायदा मात्र ग्राहकांना होणार आहे. कारण देशात साखरेचा साठा पुरेसा राहणार असल्याने दरवाढ होणार नाही. अधिक निर्यात झाल्यास देशात साखर कमी पडल्यास त्याचे दर किलोमागे चार ते पाच रूपयांनी वाढण्याची भीती व्यक्त केली जात होती. मात्र निर्यातीवर नियंत्रण आणल्याने महागाई वाढणार नाही हे स्पष्ट झाले आहे. क्लिक करा आणि वाचा- देशात पुढील तीन महिन्यासाठी ६० ते ७० लाख टन साखर शिल्लक राहणार आहे. ऑक्टोबरनंतर नवीन हंगामातील साखर उत्पादन होईल. यामुळे साखरेच्या टंचाईचा कोणताही धोका नाही. देशात वर्षाला २६० ते २७० लाख टन साखरेची आवश्यकता आहे. उर्वरित साखर निर्यात केल्याशिवाय पर्याय नाही. ही निर्यात केली तरच कारखाने शेतकऱ्यांना एफआरपी देऊ शकतात. एफआरपी देणे बंधनकारक असल्याने शेतकऱ्यांना तातडीने कोणताच फटका बसणार नाही. पण पुढील वर्षी उत्पादित साखर कारखान्याच्या गोडावूनमध्ये पडून राहिल्यास कारखान्यांचे अर्थकारण बिघडणार आहे. त्याचा फटका भविष्यकाळात शेतकऱ्यांना बसणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सरकारचा निर्णय ग्राहकांना दिलासा देणाराच आहे. यामुळे महागाईला ब्रेक लागणार आहे. क्लिक करा आणि वाचा- साखरेची यंदाची आकडेवारी साखर उत्पादन ३९० लाख टन गतवर्षीचे शिल्लक १०० लाख टन निर्यात ९० लाख टन इथेनॉल निर्मिती ३५ लाख टन देशातील वापर २७० ते २८० लाख टन यंदा शिल्लक साखर ७० ते ८० लाख टन